पुणे

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत ७ हजार ६९४ शेतकरी

CD

जिल्हा बँकेच्या २,५२९ शेतकऱ्यांना २५ कोटींची कर्जमुक्ती
ॲग्रीस्टॅक नसल्याने ३ हजार ८५६ शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २ हजार ५२९ शेतकऱ्यांना आज कर्जमुक्ती योजनेतून २५ कोटी ३२ लाख ८० हजार ६२९ रुपये मिळाले आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा बँकेचे ७ हजार ५६७ व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माळीनगर शाखेतील ९८ शेतकरी, असे एकूण ७ हजार ६९४ शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ७८ गावांची लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, ही यादी संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय व बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रमाणीकरण प्रलंबित राहण्याची प्रमुख कारणे म्हणजे ॲग्रीस्टॅक क्रमांक नसल्याने ३ हजार ८५६ शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय मयत ८५५, देवस्थान भोगवटादार वर्ग २, ३ खंडकरी शेतकऱ्यांची ४९, स्थलांतरित ८६१, बायोमेट्रिक कॅप्चर न होणे १३८, जमीन नावावर नसणे १३५ व इतर कारणास्तव ८१ शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेली पीककर्ज खाती मुद्दल व व्याजासह २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येत आहे.
कर्जाची रक्कम २ लाखांपेक्षा अधिक असल्यास शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित रक्कम भरल्यास शासनाकडून २ लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. २०२२-२३, २०२३-२४ व सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षे वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत ५९ हजार ८५१ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी १९ हजार २५७ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये समन्वयासाठी एकूण ८२ समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

कोट
प्रशासनाने आधार प्रमाणीकरणाची गती वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी गाव, तालुका पातळीवरील सहकार व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रूममध्ये... बॉलिवूड हिरोच्या पत्नीने मागे लावली डिटेक्टिव्ह; झाले धक्कादायक खुलासे

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT