पुणे

सोलापुरात ३, बार्शीत एक विशेष जलदगती न्यायालय

CD

सोलापुरात ३, बार्शीत एक विशेष जलदगती न्यायालय
जिल्हा सरकारी वकिलांची माहिती; अत्याचार पीडितांना विनाशुल्क वकिलांची सोय

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वूमन’ आणि ‘मिशन शक्ती’अंतर्गत महिला व बालकांवरील अत्याचाराचे खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण केले आहेत. त्याअंतर्गत सोलापूर शहरात तीन आणि बार्शीत एक न्यायालय स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी दिली.
पीडितांना वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक समुपदेशनाची मदत एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’, वैद्यकीय पुनर्वसन आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांची देखील उभारणी करण्यात आली आहे. आपत्कालीन मदतीसाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाइन आणि ११२ इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. सरकारच्या निर्भया फंडातून या उपाययोजना राबवल्या जात आहेत. जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीने सोलापूर शहरातील तीन व बार्शीतील एका विशेष न्यायालयात पीडितांतर्फे सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ महिला वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोषींवर जलदगतीने खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा मिळण्यास यामुळे मदत होईल, असेही ॲड. राजपूत म्हणाले.

कोट
PNE26W55932
जिल्ह्यातील चार जलदगती विशेष न्यायालयांतील कामकाजास राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, राज्य बालहक्क संरक्षण आयोग व बालकल्याण समितीची देखील मदत होणार आहे. दरम्यान, बाल पोलिस पथक किंवा स्थानिक पोलिसांना महिलांवरील अपराधाची दखल घेणे बंधनकारक आहे. तसेच, गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षात चौकशी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ॲड. प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा; ट्रॅक्टरसह दिल्लीला येण्याचे आवाहन

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT