पंधराव्या वित्त आयोगातील
निधीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषदेकडून ८५ कोटी आराखडा सादर
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या ८५ कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चास मंजुरी मिळण्यासाठी मतदारसंघनिहाय आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्याला येत्या आठवडाभरात मंजुरी मिळून नोव्हेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सदस्यनिहाय निधीचे वाटप केले जाणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये विसंवाद होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी निधीवाटपावर आक्षेप घेत सर्व सदस्यांना समान निधी देण्याची मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संमतीने अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सर्व सदस्यांचे एकमत घडवून आणले.
नाराज सदस्यांना पुढील काळात जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आणि जिल्हा परिषद सेस निधीतून निधी देण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिल्याचे समजते. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या या निधीचा तिढा आता सुटल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना नोव्हेंबरअखेरपासून वेग मिळण्याची शक्यता आहे.
--------------
चौकट-१
विकासकामासाठी निधीवाटपाचे सूत्र :-
- अध्यक्ष : ३.७० कोटी रुपये
- उपाध्यक्ष : २.७० कोटी रुपये
- सभापती व गटनेते : १.९० कोटी रुपये
- सत्ताधारी सदस्य : ९० लाख रुपये
- विरोधी सदस्य : ५० लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.