पुणे

पाठ्यपुस्तक वाटप

CD

PNE26W29715
सोलापूर : महापालिकेच्या वतीने ४३१ विद्यार्थ्यांना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रत्नराज जवळगेकर, मल्हारी माने यांच्या हस्ते पाठपुस्तकाचे वितरण करण्यात आले.

महापालिकेतर्फे ४३१ विद्यार्थ्यांना
पाठ्यपुस्तकांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
महापालिका मराठी मुलींची कॅम्प शाळा, दक्षिण सदर बाजार येथे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये माध्यमिक प्रशालांच्या इयत्ता नववीचे २०४ विद्यार्थी व इयत्ता दहावीचे २२७ विद्यार्थी, अशा एकूण ४३१ विद्यार्थ्यांना सुमारे ३ हजार ९९१ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, रिटेल, ऑटोमोबाईल व उर्दू विषयांचा समावेश होता.
प्रास्ताविक उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी सोनाली यादव यांनी केले. यावेळी शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी व मुख्यलेखापाल रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्यासह माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT