PNE26W49709 - कसबा गणपतीचे लेझीम पथक
PNE26W49701 - कसबा गणपती मंडळाच्या मिरवणूकीतील विजापूरच्या बाहुल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या
PNE26W49697 - श्रद्धानंद समाज तालमीच्या मानाच्या श्री आजोबा गणपतीची सुपारी स्वरूपातील गणेशाचे पूजन
PNE26W49698 - फुलांची उधळण करत घरी लाडक्या बाप्पांना घरी नेताना महिलाभक्त
PNE26W49699 - जनता बॅंक कर्मचाऱ्यांचे लेझीम पथक
PNE26W49700 - कृत्रिम हत्तीवर विराजमान जनता बॅंकेचे बाप्पा
श्री आले घरी, सोलापूर न्हाले भक्तिरंगात
दीड लाख घरांत गणरायाची प्रतिष्ठापना; हजारहून अधिक मंडळांत उत्साह
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : तब्बल १८ दिवस उशिराने आलेल्या बाप्पांची प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली. आठवडाभरापासून ज्या दिवसाची घराघरांत तयारी सुरू होती, तो दिवस अखेर उजाडला अन् लाडके गणाधीश घराघरांत विराजमान झाले. सजलेले उंबरठे, पूजेसाठी सज्ज झालेले ताट अन् श्रींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणारी कुटुंबे... ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘आला रे आला गणपती आला’च्या जयघोषात बाप्पा घरी आल्याचा आनंद सोलापूरकरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भक्तिभावात शहरभर गणेशोत्सवाची सुरुवात झाली.
सकाळपासून मूर्ती विक्रीची ठिकाणे, बाजारपेठा अन् प्रमुख रस्त्यांवर कुटुंबांसह बाप्पा घेऊन जाणाऱ्यांची लगबग दिसत होती. हार-फुले, पाच फळे अन् पूजासाहित्याच्या खरेदीने बाजारपेठांनाही उत्सवाचे रूप आले. सकाळपासूनच शहरातील विविध भागांत मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. पारंपरिक रूपापासून विविध आकर्षक आकारांतील गणेशमूर्तींना मागणी होती. गणेशमूर्ती, पूजासाहित्य अन् मोदक खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. रस्ते अन् परिसर सर्वत्र चैतन्याने भरून गेल्याचे जाणवत होते. यंदा १२ दिवस गणेशोत्सव असणार आहे.
कसबा गणपतीचा ५०० जणांचा लेझीम ताफा
चार हुतात्मा पुतळा येथे सकाळी १० वाजता महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीची महापूजा व आरती करण्यात आली. सनई-चौघडा, पंचरंगी झेंडा, पाच बैलजोड्या, दोन घोडे, हलग्या, पालखी अन् आकर्षक वेशभूषेतील बाहुल्यांसह तब्बल ५०० युवकांच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला. यासोबतच पौराणिक कथा, कला अन् संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिरेखांचे साकारलेले देखावे सादर करण्यात आले. विविध ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
सकाळी ९.४५ वाजता आजोबा गणपतीची सुपारी स्वरूपात स्थापना
श्रद्धानंद तालमीच्या मानाच्या आजोबा गणपतीची स्थापना सुपारी स्वरूपातील गणेशाचे सकाळी ९.४५ वाजता ट्रस्टी अध्यक्ष तथा आमदार विजयकुमार देशमुख व काका मेंडके यांच्या हस्ते पूजन करून झाली. सकाळी आठ वाजल्यापासून महारुद्राभिषेक, १०८ दुर्वा नामावली, अथर्वशीर्ष पठण अन् होमहवन करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. पौरोहित्य वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांनी केले.
दीड लाख घरगुती तर हजारहून अधिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना
शहरातील मूर्ती कलाकारांच्या सांगण्यानुसार, शहरात तब्बल दीड लाख घरगुती गणेशमूर्तींची, तर हजारहून अधिक मंडळांमध्ये यंदा नवीन मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली.
कोट
- महाराष्ट्रात पाऊस अत्यल्प आहे. बळीराजा संकटात आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी पाऊस पडू दे. भरघोस पीक शेतशिवारात बहरू दे, अशी मागणी आज श्री आजोबा गणपतींच्या चरणी केली.
- विजयकुमार देशमुख, आमदार तथा ट्रस्टी अध्यक्ष, आजोबा गणपती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.