पुणे

९,७०४ जणांना उच्च रक्तदाब, ८,०९९ जणांना मधुमेह

CD

९,७०४ जणांना उच्च रक्तदाब, ८,०९९ जणांना मधुमेह
दीड लाख नागरिकांची तपासणी; मुखाच्या कर्करोगाचे १५२ संशयित

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून उपचार सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ‘तिशीचा पल्ला; तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष अभियान हाती घेतले आहे. १ सप्टेंबर ते १० डिसेंबरदरम्यान सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७११ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ९,७०४ जणांना उच्च रक्तदाब, तर ८,०९९ जणांना मधुमेह आढळून आला.
गाव, वाडी-वस्ती पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पथके घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करीत आहेत. प्राथमिक अवस्थेत आजाराचे निदान झाल्याने संबंधितांवर तातडीने उपचार सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कर्करोग तपासणीलाही प्राधान्य
अभियानांतर्गत कर्करोगाच्या प्राथमिक तपासणीवरही भर देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९,३८० जणांची मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली असून, त्यातील १५२ संशयितांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. १८,९७९ महिलांची स्तन कर्करोगाची तपासणी झाली असून, ६२ संशयित महिलांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. १८,१३० महिलांची गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी पूर्ण झाली आहे.

कोट...
‘अनेक असंसर्गजन्य आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे न दाखवता शरीर पोखरत राहतात. त्यामुळे आजार गंभीर होण्यापूर्वीच त्याचे निदान होणे गरजेचे आहे. ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने आशा स्वयंसेविका, आरोग्य पथक किंवा जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Net Worth: राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती? ऑफीस 'एवढ्या' कोटींचं! शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक

Pune News : औंधमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन; राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून झाडली गोळी

Numerology: 'या' मूलांकाच्या दीर-वहिनीची जोडी का मानली जाते नंबर वन? नात्यात असते हसणे, चिडवणे, प्रेम अन् विश्वास...

गरबा आणि दांडिया एकच नाही! दोन्ही नृत्यप्रकार करण्याचीही आहे वेगवेगळी वेळ; जाणून घ्या नेमका फरक काय

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

SCROLL FOR NEXT