पुणे

आरोग्य समिती समिती सभा

CD

PNE26W17752 -
सोलापूर ः आरोग्य समितीच्या बैठकीत बोलताना सभापती चेतनसिंह केदार. यावेळी समिती सदस्य व अधिकारी.

सर्पदंश, श्वानदंश लसींसाठी ५० लाखांची तरतूद
चेतनसिंह केदार : आणखी दीड कोटींसाठी शासनाकडे पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंश व श्वानदंश लसींचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हा परिषद सेसमधून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच आणखी दीड कोटी रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद सेसच्या ५.१० कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे सादर केलेल्या मंजूर आराखड्यालाही शिफारस करण्यात आली.
बैठकीस सदस्य सोनाली कडते, संगीता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे व सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील पाणी गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वेळेत पाणी नमुने तपासणी होणे आवश्यक असल्याचे केदार यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना श्वानदंश लस उपलब्ध व्हावी, यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी भविष्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर सिस्टिम बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागील दोन वर्षांपासून विविध कामांची थकीत बिले प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून देत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयातून मार्ग काढण्याच्या सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT