पुणे

महापालिका दवाखान्यात देणार

CD

महापालिका दवाखान्यांत सोनोग्राफी मशीन देणार
आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी तीन ठिकाणी पोर्टाकेबिन

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने गर्भवती महिलांना तपासणीसाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने सोनोग्राफी व कलर डॉप्लर मशीन खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्या.
महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये सध्या सोनोग्राफी मशीन उपलब्ध नाही. तसेच डफरीन व दाराशा प्रसूतिगृहांत कलर सोनोग्राफीची सुविधाही नसल्याची बाब नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. आर्थिक परिस्थिती नसतानाही गर्भवती महिलांना खासगी दवाखान्यात तपासणीसाठी जावे लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याकडून माहिती घेऊन सोनोग्राफी व कलर डॉप्लर मशीन खरेदीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रस्ताव आल्यानंतर आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असे महापौर कोंड्याल यांनी सांगितले.
दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगांतर्गत मंजूर आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी पूर्वनिश्चित जागांवर तांत्रिक कारणांमुळे पोर्टाकेबिन उभारणे शक्य नसल्याने चंद्रकला नगर, सितारा चौक व नई जिंदगी येथे पोर्टाकेबिनद्वारे केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhuloba Ramling Devasthan : कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला; भाविकांमध्ये संताप

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

SCROLL FOR NEXT