पुणे

वास्तव वेध प्रभाग 13

CD

वास्तव वेध
प्रभाग १३
---
रस्ते खराब, ड्रेनेज तुंबते अन्‌ पथदिवेही बंद!
पाथरूट चौकात सुविधांचा ठणठणाट; सांडपाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था
अरविंद मोटे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि पथदिव्यांच्या समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पाथरूट चौक हा अशोक चौक आणि सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्याने या परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र, या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक सुविधांची कमतरता दूर करण्याची मागणी होत आहे.
पाथरूट चौकातील सार्वजनिक मुतारी पाडण्यात आल्याने नागरिकांना उघड्यावर लघुशंका करावी लागत असल्याची तक्रार आहे. परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्थाही दयनीय आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवशी ड्रेनेजलाइन तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या सांडपाण्यामुळे पाथरूट चौक ते सिव्हिल हॉस्पिटल मार्गावरील रस्ताही खराब झाला आहे.
पाथरूट चौकातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण कधी झाले, हे सांगता येत नसून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचीही अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. पाथरूट चौक ते अशोक चौक मार्गावरील पथदिवे रात्री बंद राहात असल्याने अंधाराची समस्या निर्माण होत आहे.
जवाहर नगरमधील लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अशोक चौक (मिनी नवी पेठ) परिसरातील दुकानदारांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, अतिक्रमण हटविलेल्या जागेवरील भराव काढून तेथे वृक्षारोपण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाने या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते दुरुस्ती, ड्रेनेजची स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
---
कोट
SLC26B30216
प्रभागातील नागरी समस्यांबाबत स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि पथदिव्यांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करावा.
- अशोक म्हेत्रे, स्थानिक नागरिक
---
कोट
SLC26B30222
आमच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये कोणतेही सार्वजनिक शौचालय पाडण्यात आलेले नाही. जुनी शौचालये दुरवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- विजय चिप्पा, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT