पुणे

दक्षिणमधील सिंचनप्रश्‍नी कार्यवाहीचे निर्देश

CD

PNE26W29828
सोलापूर : मुंबईतील मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अधिकारी.

‘दक्षिण’मधील सिंचन प्रकल्पांना गतीचे संकेत
वडापूर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर, भीमा-सीना जोडकालव्याबाबत कार्यवाहीचे विखे-पाटील यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वडापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर, वडापूर-अकोले (मंद्रूप) भीमा-सीना जोडकालव्याला मंजुरी व निधी उपलब्ध करून देणे, तसेच सीना नदीवरील विविध बॅरेज प्रकल्पांबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील मंत्रालयात बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील सिंचन, जलसाठा आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक प्रश्न मांडले. बैठकीत सीना नदीवरील नंदूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देणे, नंदूर ते अकोले (मंद्रूप) दरम्यान उच्चस्तरीय बॅरेज उभारणे, तसेच देगाव कालव्याद्वारे विविध तलावांमध्ये उजनीचे पाणी नियमित सोडण्याच्या विषयांवर चर्चा झाली.
याशिवाय फताटेवाडी पंपहाऊस येथे यांत्रिकी व विद्युत संच उभारणे, तेथून होटगी तलावापर्यंत जलवाहिनी टाकणे, भीमा व सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करणे, तसेच नदीकाठच्या गावांसाठी पूरप्रतिबंधक घाटबांधणीची कामे हाती घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत देगाव, प्रतापनगर-सोरेगाव, कुमठे, बसवेश्वरनगर आणि सलगरवाडी येथील शेतकऱ्यांना जमीन संपादनावेळी रेडीरेकनरनुसार मोबदला मिळावा, होटगी येथील संपादित जमिनीतील डाक बंगला परिसराचे सुशोभीकरण व्हावे, तसेच शंभर वर्षे जुन्या होटगी तलावाच्या मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही मांडण्यात आल्या.

चौकट
पूरग्रस्त बंधारे अन्‌ कालव्यांच्या दुरुस्तीवर भर
गतवर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे भीमा आणि सीना नदीवरील अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बाधित झाले होते. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक लोखंडी बर्गे उपलब्ध करून देणे, कालव्यांच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि झाडझुडपे हटविण्यासाठी संयुक्त मोहीम राबविणे, या मागण्यांकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले. तसेच महापुरामुळे शेतजमिनीवर साचलेल्या चिबडाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

कोट
‘‘दक्षिण सोलापूरमधील सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांबाबत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकल्पांना गती मिळून शेतकरी आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास आहे.’’
- सुभाष देशमुख, आमदार, सोलापूर दक्षिण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT