पुणे

सोलापूरच्या विकासाचा ''कोहिनूर हिरा''

CD

सोलापूरच्या विकासाचा ‘कोहिनूर हिरा’
...............
नेतृत्व पदाने मिळत नाही, तर कर्तृत्व आणि जनतेच्या विश्वासातून कमवावे लागते. सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र (दादा) राजेश कोठे यांनी अभ्यासू, आक्रमक आणि संयमी कार्यपद्धतीतून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या राष्ट्रनिष्ठ संस्कारातून घडलेल्या दादांनी संघटन कौशल्याच्या जोरावर पक्ष मजबूत केला आणि अल्प वयात मिळालेली आमदारकी आपल्या कार्यातून सार्थ ठरवली.
---
- सीए विनोद भोसले, नगरसेवक
---
सोलापूरच्या कामगार चाळींचा शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘बी२’चा जटिल प्रश्न त्यांनी शासन पातळीवर प्रभावी पाठपुरावा करून मार्गी लावला. हजारो कामगार कुटुंबांना त्यामुळे हक्क मिळाला. वर्षानुवर्षे रखडलेल्या सोलापूर विमानतळाच्या प्रश्नासाठी दिल्ली ते मुंबई पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करत विमानसेवा सुरू करून दाखवली.
२०१६ पासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आयटी पार्कचा विषयही मार्गी लावला. सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक विजयात त्यांची व्यूहरचना महत्त्वाची ठरली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विधिमंडळात त्यांच्या कार्याचे कौतुक करत ‘आमदार असावा तर देवेंद्र कोठेंसारखा’ असा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरलेला हा ‘कोहिनूर हिरा’ आज सोलापूर भाजपचा विश्वासू आणि प्रभावी चेहरा म्हणून पुढे आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT