WDL26B02717
वडाळा (ता. उ. सोलापूर) : येथे जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महाशिबिराचे उद्घाटन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, यावेळी उपस्थित पोलिस आयुक्त एम. राजकुमार, फिरदोश पुनावाला, मनोज शर्मा व इतर.
.......
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे
न्यायमूर्ती जमादार; माऊली महाविद्यालयात विधी व सेवा महाशिबिर
वडाळा, ता. १ : समाजातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार यांनी केले.
नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मुंबई महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील माऊली महाविद्यालयात विधी व सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सुमारे सहा हजार नागरिकांनी उपस्थिती लावली.
महाशिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती जमादार व फिरदोश पुनीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी, ॲड. बाबासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती जमादार म्हणाले की, विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना १९८७ मध्ये गरजू नागरिकांना न्यायालयीन मदत देण्यासाठी झाली. मात्र केवळ न्यायालयीन सहाय्य पुरेसे नसून नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती पुनीवाला यांनीही न्यायव्यवस्था सक्षम असेल तर लोकशाही अधिक बळकट होते, असे सांगत सर्वसामान्यांपर्यंत न्याय व योजना पोहोचविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. न्यायाधीश अश्विनी बिराजदार व न्यायाधीश वैष्णवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी आभार मानले.
महाशिबिरात विविध
४० स्टॉल्सची उभारणी
महाशिबिरात विविध शासकीय विभागांचे ४० स्टॉल्स उभारण्यात आले होते. लाभार्थ्यांना योजनांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर व सहकाऱ्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.