पुणे

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन महिन्यांचा कारावास

CD

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;
आरोपीस कारावासाची शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : येथील सात रस्ता परिसरातील संगमेश्वर महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. १४ मार्च २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. यात जिल्हा न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या तरुणास तीन महिन्यांची कैद, एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सौरभ संजय पाताळे (रा. उत्तर कसबा) असे त्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी (१७ वर्षे ८ महिने) संगमेश्वर कॉलेजमध्ये अकाउंट विषयाचा पेपर द्यायला आली होती. पेपर संपल्यानंतर ती घरी परत आली नव्हती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी नातेवाईक, मुलीच्या मैत्रिणींकडे तिची चौकशी केली होती. मात्र, तिचा शोध लागला नाही. सौरभ पाताळे हा कॉलेजमध्ये मुलीसोबत ओळख वाढवून जवळीक साधत होता, तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याची माहिती मुलीच्या पालकांना मिळाली होती. मुलाच्या त्रासामुळे ती मुलगी पेपर न देताच सोलापूरवरून गाणगापूर, कलबुर्गी, हुबळी येथून पुन्हा सोलापुरात आली आणि शेवटी घरी गेली. तत्पूर्वी, मुलीच्या पालकांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार सौरभ पाताळेविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यात सहायक पोलिस निरीक्षक चानकोटी यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यातील साक्षीदारांचे जबाब, कागदपत्रांच्या आधारावर जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी सौरभ पाताळे याला शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला प्रत्येकी १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सरकारतर्फे कविता बागल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. यात कोर्टपैरवी म्हणून हवालदार प्यारन नदाफ, दोषसिद्धी कक्षाकडील सहायक पोलिस निरीक्षक राजेश डोकेवाड, उपनिरीक्षक राजू मुद्दे, हवालदार दैवशाला मैंदाड यांची मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT