पुणे

महापालिकेच्या मिनी गाळ्याचा चक्क दारू पिण्यासाठी गैरवापर

CD

SLC26B28320 : मनपाच्या मिनी गाळ्‍यामध्ये चक्क दारू पिण्यासाठी गैरवापर केला जातो.
SLC26B28321 : सोलापूर : अक्कलकोट रोडवरील शांती चौकातील तीन टपऱ्या व इतर साहित्य जप्त करताना अधिकारी.


मनपाच्या मिनी गाळ्याचा चक्क दारू पिण्यासाठी गैरवापर
अतिक्रमण प्रतिबंधक कारवाईदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ४ : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी जवळील शांती चौकात महापालिकेच्या मिनी गाळ्याचा वापर चक्क दारू पिण्यासाठी केला जात आहे. असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हा गाळा बंद करण्यात आला असून तत्काळ गाळ्याची कागदपत्रे मागविली आहेत. या परिसरात आज महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करून तीन टपऱ्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
महापालिकेच्या जागेत सुरुची नावाचे अनधिकृत हॉटेल चालविण्यात येत असल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून पथकाने या ठिकाणी कारवाईची मोहीम घेतली. संबंधित हॉटेल धारकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नसल्याने बुधवारी दुपारपर्यंत ही कागदपत्रे सादर करण्याची सूचना अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केली. दरम्यान, याच ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या एका मिनी गाळ्यामध्ये चक्क दारू पिताना काहीजण आढळून आले. तत्काळ अधीक्षक बनसोडे यांनी या गाळेधारकाला कागदपत्रांची मागणी केली. तूर्तास हा गाळा बंद करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधितांवर पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे.
------------------------------------
मनपाच्या जागेचा गैरवापराची दुसरी घटना
यापूर्वी बाळीवेस येथील महापालिकेच्या एका बंद कार्यालयाचा दारू पिण्यासाठी वापर होत असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने थेट कारवाई करत हे कार्यालय ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता शांती चौकातील मनपा मिनी गाळ्याचा वापरही दारू पिण्यासाठी होत असल्याचे आज उघडकीस आले आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Horoscope : उद्या 5 मार्च! 'या' 5 राशीच्या लोकांसाठी 'महालक्ष्मी-धनलाभ योग'; होईल आर्थिक फायदा, नोकरी-धंद्यात काहीतरी मोठं घडणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT