पुणे

प्रशिक्षणार्थी विमान सोलापूरात धावपट्टीवर आदळले

CD

पुणे, ता. १२ : बारामतीहून उड्डाण केलेल्या ‘रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग ॲकॅडमी’च्या प्रशिक्षणार्थी विमान गुरुवारी दुपारी सोलापूर विमानतळावर उतरताना आदळले. विमानाचा वेग सुमारे १०० ते ११० किलोमीटर असल्याने पुढील चाकाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक थोडक्यात बचावली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले असून शुक्रवारी (ता. १३) पथक सोलापुरात दाखल होणार आहे.

‘टेक्नाम पी-मेंटॉर’ या दोन आसनी आणि सिंगल इंजिन विमानाने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बारामतीहून उड्डाण केले. या विमानात एक महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक होती. दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर विमानतळावर उतरताना विमान धावपट्टीवर जोरात आदळल्याने पुढील टायर फुटले आणि चाक दुमडले गेले. त्यामुळे विमानाचा पुढचा भाग थेट धावपट्टीवर घासला गेला आणि विमान धावपट्टीच्या मधोमध अडकून पडले. या घटनेला रेड बर्ड ॲकॅडमीच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला आहे. हे विमान नवीन असून २०२५ मध्येच ॲकॅडमीच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

‘डीजीसीए’ करणार तपासणी
‘डीजीसीए’ने या अपघाताची दखल घेतली असून शुक्रवारी (ता. १३) एक पथक सोलापूर विमानतळावर दाखल होणार आहे. ‘डीजीसीए’चे पथक विमानाची पाहणी करून हिरवा कंदील देत नाही, तोपर्यंत विमान धावपट्टीवरून हटवता येणार नाही. हे विमान धावपट्टीवरून खाली घसरले नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT