पुणे

सोलासोलापूर लोहमार्ग पोलिसांचा बालकांशी संवाद पूर लोहमार्ग पोलिसांचा बालकांशी संवाद

CD

PNE26W47532
सोलापूर : निरीक्षणगृहात उपस्थित लोहमार्ग पोलिस.
---
बालगृहातील मुलांशी
पोलिसांचा थेट संवाद
बालकल्याण समितीसोबत समन्वयावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार विशेष बाल पोलिस पथक आणि बाल कल्याण पोलिस अधिकाऱ्यांच्या वतीने सोलापूर येथील बालगृह व निरीक्षण गृहातील बालकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच बालकांच्या हक्कांचे संरक्षण, काळजी व पुनर्वसनासाठी बालकल्याण समितीसोबत समन्वय बैठक घेण्यात आली.
यावेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी व विनोद घाटे यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधला. पोलिस ठाण्यातील कामकाज, पोलिसांची संवेदनशील भूमिका आणि बालकांचे हक्क याबाबत त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिसांनी हसत-खेळत उत्तरे देत त्यांच्यातील भीती दूर करून विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
बालकांच्या संरक्षण, काळजी आणि पुनर्वसनासाठी पोलिस विभाग व बालकल्याण समितीमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ॲड. सुवर्णा कोकरे यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पारडे, हवालदार नंदकुमार राठोड, महिला हवालदार लांबतुरे, बालगृह अधीक्षक मारुती भिसे आणि बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

SCROLL FOR NEXT