पुणे

शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावर राडा

CD

शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावर राडा

पेट्रोल भरताना वाद; काही वेळाने पोरं आणून केली मारहाण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : येथील अशोक चौकी पोलिसजवळील शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावर हत्तुरे वस्तीतील तरुणांनी राडा घातला. पेट्रोल भरण्यासाठी गेल्यावर झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी पुन्हा तेथे येऊन एकास बेदम मारहाण केली. यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी म्हाळप्पा देवरू हेळवी (रा. ओमगर्जना चौक, सोलापूर) यांच्या तोंडाला, डोक्याला जखम झाली आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन नोटीस दिली. तर, अन्य संशयितांचा शोध जेलरोड पोलिस घेत आहेत.
सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावर वीरभद्र कांते गेला होता. त्यावेळी त्याने गाडी आडवी लावल्याने तेथील महिला व तृतीयपंथी कर्मचाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडी बाजूला करण्यास सांगितले, पण तो ऐकत नव्हता. त्यानंतर त्याला गाडी दुसऱ्या लेनमध्ये घ्यायला सांगितले असता त्याने मध्येच आणून गाडी थांबविली. मी स्टाफ असल्याचे सांगितल्याने त्याला पोलिसांच्या विशेष लेनमध्ये पाठविले. पण, तो स्टाफ नसल्याने त्याला पुन्हा दुसऱ्या लेनकडे पाठविले. त्यावेळी तो तेथील महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत होता. कर्मचाऱ्याने कार्यालयात जाऊन म्हाळप्पा यांना सांगितले. त्यांनी वीरभद्रला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो अरेरावी करत होता. त्यावेळी सर्वांनी त्याला समजावून तेथून पाठवले. पण, या वादाचा राग मनात धरून तो तिघांना घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आला. त्यांनी शर्टच्या आत काठ्या लपवून आणल्या होत्या. कार्यालयात शिरून वीरभद्र कांते, यश कांते, प्रभात प्रकाश फणसे व अन्य एका अनोळखी व्यक्तीने म्हाळप्पा यांना जबर मारहाण केली. कार्यालयात शिरून चौघांनी म्हाळप्पाच्या डाव्या हातावर, पाठीवर, मांडीवर, तोंडावर मारहाण केली. कार्यालयातील साहित्याचीही तोडफोड केली, अशी फिर्याद म्हाळप्पा हेळवी यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक शिवम येडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT