पुणे

प्रभाग १८

CD

(प्रभाग १८)
-------------------
PNE26W19796
सोलापूर : प्रभाग १८ मधील रस्त्याची कामे वारंवार झाल्याने घरे रस्त्यांच्या उंचीपेक्षा खोलवर गेल्याचे मार्कंडेय नगर परिसरातील चित्र.
-----------------------------------------
इलेक्ट्रिक मोटारीशिवाय नळाला येत नाही पाणी
पाण्याचा प्रश्न गंभीर; रस्ते चकाचक, पण उंची वाढल्याने घरांचे दरवाजे खड्ड्यात
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : प्रभाग १८ हा माजी महापौर श्रीकांचन यन्नम यांचा असून, येथे शिवानंद पाटील, प्रशांत पल्ली व राजेश्री धोडमनी हे नगरसेवक आहेत. प्रभागातील अंतर्गत व मुख्य रस्ते चकाचक आहेत; मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सहा दिवसांतून एकदा पाणी येते. इलेक्ट्रिक मोटार लावल्याशिवाय नळाला पाणी येत नाही, असे गाऱ्हाणे नागरिकांनी ‘सकाळ’कडे मांडले. पुरेशा दाबाने पाणी सोडावे, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.
गेंट्याल टॉकीज, भारतरत्न इंदिरा नगर, आदर्श नगर, मुमताज नगर, मार्कंडेय नगर, शासकीय क्रीडा संकुल, संजय नगर, कुमठा नाका असा परिसर प्रभाग १८ मध्ये येतो. प्रभागातील स्वच्छता व रस्ते एकदम चकाचक दिसून आले. आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून या प्रभागातील बहुतेक रस्त्यांची कामे झाली आहेत. तरुणांना रोजगारासाठी जवळच अक्कलकोट रोड एमआयडीसी आहे. मात्र, महिलांच्या हाती विड्याची पाने दिसतात. सहा दिवसांतून एकदा पाणी येते आणि पाण्याची वेळदेखील अनिश्चित असते. किमान तीन दिवसांतून एकदा आणि निश्चित वेळेत पाणी यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
‘एमएसईबी’चे काही डीपी रस्त्यातच आहेत. ते बाजूला घ्यावेत, जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टळतील. दुसरीकडे, पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरते, कारण रस्ते उंच आणि घरे खाली गेली आहेत. त्यामुळे रस्त्यांची वाढलेली उंची कमी करावी, जेणेकरून पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली.
------------
प्रतिक्रिया
PNE26W19790
मतदारसंघाचे आमदार व नगरसेवकांनी प्रभागातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण केले आहे. मात्र, प्रभागात सहा दिवसांतून एकदा पाणी येते. विशेष म्हणजे, नळाला इलेक्ट्रिक मोटार लावल्याशिवाय पुरेशा दाबाने पाणी येत नाही. पाण्याची वेळदेखील निश्चित नसते.
- रवी सबसगी, मार्कंडेय नगर
---------
PNE26W19792
संजय नगर (कुमठा नाका) चौकाजवळील चमडा कारखान्याच्या बाजूच्या एका रस्त्यावर खडीकरण झाले, पण त्यावर डांबर किंवा सिमेंट काँक्रिट टाकायचे राहिले आहे. लोकप्रतिनिधींनी प्रभागातील बहुतेक कामे केली आहेत; मात्र पाण्याची समस्या इतर प्रभागांप्रमाणे प्रभाग १८ मध्येही गंभीर आहे.
- कपिल घागरे, संजय नगर, कुमठा नाका
--------------------
कोट : PNE26W19793
प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार सर्व नगरसेवकांनी मिळून बहुतेक कामे केली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळीकडेच आहे. आगामी काळात नागरिकांना निश्चितपणे नियमित पाणी मिळेल. आता ज्या भागांतील अंतर्गत रस्ते राहिले आहेत, तेथील कामे होतील. पावसाळ्यात ड्रेनेज तुंबणार नाही, यादृष्टीनेही कामे केली जातील.
- शिवानंद पाटील, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT