रेल्वे पुलाच्या कामाला वेग;
रस्ता रुंदीकरण युद्धपातळीवर
सोलापूर, ता. ७ : मरीआई चौक ते अण्णाभाऊ साठे चौकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाला गेल्या दोन दिवसांत वेग आल्याचे चित्र आहे. पुलावरून अण्णाभाऊ साठे चौकाकडे उतरताना डाव्या बाजूची नरसिंग गिरजी मिलची जुनी दगडी भिंत पूर्णपणे पाडण्यात आली आहे. या ठिकाणी पुलाच्या उतारापासून लक्ष्मी मंदिरापर्यंत नवीन भिंतीसाठी पिलर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने ‘रेल्वे पुलाचे काम संथगतीने’ या वृत्तातून कामाच्या गतीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर सध्या पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ते व संरक्षक भिंतींच्या कामाला वेग देण्यात आला आहे. मरीआई चौकाच्या दिशेने मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सिमेंटच्या प्लेटा टाकण्याचे काम सुरू असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात येत आहे.
मिलची दगडी भिंत हटविल्याने डाव्या बाजूला मोठी जागा उपलब्ध झाली असून, रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे चौकाच्या दिशेने जाणारा मार्ग पूर्वीपेक्षा मोठा होण्याची शक्यता आहे. उजव्या बाजूची जुनी भिंत मात्र कायम ठेवण्यात आली आहे. मरीआई चौकातून सर्व्हिस रोडचे कामही सध्या वेगाने सुरू आहे. पुलाच्या मुख्य कामासोबत जोडरस्ते, भराव आणि भिंतींची कामे पुढे सरकत असली तरी मुख्य रेल्वे पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास अद्याप काही कालावधी लागणार दिसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.