पुणे

जुन्या रेल्वेचा वारसा, सोलापुरी चादरीची शान!

CD

PNE26W61168
सोलापूर : रेल्वेच्या सोलापूर विभागाने आयोजिलेल्या ‘स्टेशन महोत्सवा’चे केक कापून उद्‌घाटन करताना अधिकारी व कर्मचारी.
---
जुन्या रेल्वेचा वारसा, सोलापुरी चादरीची शान!
सोलापूर स्थानकावर ‘स्टेशन महोत्सव’; ऐतिहासिक छायाचित्रे, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : जुन्या रेल्वे मार्गांची छायाचित्रे, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या (जीआयपीआर) काळातील वस्तू आणि सोलापुरी चादरीचा खास स्टॉल... अशा वैशिष्ट्यांमधून सोलापूर रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन शुक्रवारी (ता. २३) घडले. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे आयोजित ‘स्टेशन महोत्सवा’त भरविण्यात आलेल्या वारसा प्रदर्शनाने रेल्वेच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे उलगडले. स्थानकाच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.
प्रदर्शनात ऐतिहासिक रेल्वेमार्ग आणि गाड्यांची छायाचित्रे, जुन्या रेल्वे व्यवस्थेशी संबंधित वस्तू यांचा समावेश होता. त्यातून रेल्वे वाहतुकीतील बदल, अभियांत्रिकी कौशल्य आणि भारतीय रेल्वेचा विकास जाणून घेण्याची संधी प्रवाशांना मिळाली. सोलापुरी चादरीच्या स्टॉलमुळे या उपक्रमाला स्थानिक संस्कृतीची जोड मिळाली. रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी प्रदर्शनाला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. केक कापून महोत्सव साजरा करण्यात आला.
२० एप्रिल १८९१ रोजी स्थापन झालेले सोलापूर स्थानक मुंबई- चेन्नई मुख्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक यांना जोडणाऱ्या या स्थानकातून प्रवासी वाहतुकीबरोबरच पार्सल आणि मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि रेल्वेच्या वाटचालीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोचवणे, हा या महोत्सवाचा उद्देश होता.
---
चौकट
सोलापूर स्थानकाची सद्यःस्थिती
- दररोज थांबणाऱ्या गाड्या : ७६
- दररोजचे सरासरी प्रवासी : १९,१८८
- दैनिक सरासरी उत्पन्न : सुमारे ५० लाख रुपये
- दररोजची बाहेर जाणारी पार्सल वाहतूक : २०९ युनिट
- मालवाहतूक : दररोज २३ रेक; २२ येणारे आणि एक जाणारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT