पुणे

सोलापूर रेल्वे स्थानकावर अतिक्रमण

CD

PNE26W15268
सोलापूर : येथील रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणे.
---
रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणास अतिक्रमणाचे ग्रहण
अमृत भारत योजनेतून ‘कायापालट’ झालेल्या सोलापूर स्थानकासमोर लागले हातगाडे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकाचे रूप पालटले असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने येथे कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग आता आधुनिक आणि देखणा झाला असला, तरी प्रवेशद्वारासमोरच असलेल्या अतिक्रमणांमुळे या सुशोभीकरणावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. स्थानकाच्या बाह्य भागाचे आकर्षक वास्तुशिल्प आणि रात्रीच्या वेळी झगमगणारी रोषणाई यामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडली आहे. मात्र, या दिमाखदार प्रवेशद्वारासमोरच अनधिकृतपणे उभे राहणारे आइस्क्रीमचे गाडे, चप्पल विक्रेते, पान शॉप आणि चहाच्या टपऱ्यांनी संपूर्ण परिसराचे विद्रूपीकरण केले आहे.
----
चौकट
प्रवाशांना नाहक त्रास
स्थानकाबाहेर वाढलेल्या या अतिक्रमणांमुळे केवळ सौंदर्याचाच प्रश्न निर्माण झालेला नाही, तर प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या मार्गातही अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळी या अनधिकृत विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांना धक्काबुक्की सहन करावी लागते. यामुळे स्थानक परिसरात अस्वच्छताही वाढत असून, रेल्वेने केलेल्या स्वच्छतेच्या दाव्यांनाही हरताळ फासला जात आहे.
---
महापालिका अन्‌ रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
‘अमृत भारत’ योजनेतून विकासकामे पूर्ण झाल्यानंतर त्याचे जतन करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, प्रवेशद्वारासमोर अशा प्रकारे गाड्यांची रांग लागलेली असताना रेल्वे प्रशासन आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करून कारवाई का करत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. एका बाजूला शहराच्या वैभवात भर पडत असताना, दुसरीकडे अशा अतिक्रमणांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.
..................
कोट
PNE26W15283
सोलापूर रेल्वे स्थानक आता खूप सुंदर दिसत आहे. पण समोर उभे राहणारे हे गाडे या सौंदर्याला बाधा आणत आहेत. प्रशासनाने तातडीने या अतिक्रमणांचा बंदोबस्त करून स्थानक परिसर मोकळा आणि स्वच्छ ठेवावा, एवढी प्रवाशांची इच्छा आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sejal Pawar Video Controversy : सेजल पवारच्या व्हिडिओवरून AIMSA च्या पदाधिकारी कनिष्का कालरांची तीव्र नाराजी, "शरिराचा आकार, 'त्या' व्हिडिओमुळे वाईट वाटलं"

Onion Procurement Scam: कांदा खरेदीत ५४ कोटींचा घोटाळा, गतवर्षीच्या खरेदी कांद्यापैकी २९ हजार ७४० टनांची तफावत; अहवालात धक्कादायक माहिती समोर..

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

SCROLL FOR NEXT