रेल्वेतर्फे सोलापूर विभागात
‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा
सोलापूर, ता. २ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आज ‘स्वच्छ भारत दिवस २०२६'' साजरा झाला. लातूर, कलबुरगि, कुर्डुवाडी, पंढरपूर, वाडी आणि होटगी या ठिकाणी स्वच्छता, जनजागृती, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम झाले. रेल्वे अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, सफाई मित्र आणि इतर संबंधित घटकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. रेल्वे परिसर स्वच्छ, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक केला.
विविध ठिकाणी रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सफाई मित्रांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. डीआरएम कार्यालयापासून सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंत ''स्वच्छ रेल, स्वच्छ भारत'' या घोषणेसह एक ''स्वच्छ प्रभात फेरी'' काढण्यात आली. एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत, बँक ऑफ बडोदा (प्रादेशिक शाखा, सोलापूर) यांच्या सहकार्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील ''रेल वन विहार'' येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात विविध प्रकारची सुमारे ७० रोपे लावण्यात आली. जय हिंद फूड बँक या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, स्थानकाच्या नव्याने विकसित केलेल्या ''सर्क्युलेटिंग एरिया''जवळील ''मॉडेल टॉयलेट्स''च्या (आदर्श प्रसाधनगृहांच्या) परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
---पूर्ण---प्रमोद बोडके----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.