पुणे

वेध वास्तवाचा प्रभागा क्रमांक २३

CD

PNE26W29060 - सोलापूर : सिद्धेश्वर वन विहार ते रामवाडी, सेटलमेंट रस्त्याला जोडून शहराशी कनेक्टिव्हिटी वाढवणारा हाच तो रस्ता.

कनेक्टिव्हिटी, शिक्षण अन् विकासाचा त्रिवेणी संगम
शहरी भाग, गावठाणाच्या संस्कृतीचा संगम; नागरिकांच्या अपेक्षा मात्र कायम
प्रभुलिंग वारशेट्टी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : एकेकाळी दिवसाढवळ्या जाण्यासही नागरिक कचरत असलेला आणि सूर्यास्तानंतर सामसूम होणारा प्रभाग क्रमांक २३ आज झपाट्याने बदलत आहे. रामवाडी ते सिद्धेश्वर वन विहार या मार्गांमुळे परिसराला नव्या कनेक्टिव्हिटीची ओळख मिळाली असून, सोलापूरच्या वाढत्या शहरी विस्तारात हा प्रभाग महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पांढरपेशा वर्गाचे प्राबल्य असलेल्या या भागात आधुनिक शहरीकरण आणि गावठाण संस्कृतीचा सुरेख संगम पाहायला मिळतो.
--------------
शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख
पोतदार इंटरनॅशनल स्कूल, सेंट थॉमस स्कूल तसेच ए. जी. पाटील यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे या परिसराची शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सुधारलेल्या दळणवळण सुविधांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांची ये-जा अधिक सुलभ झाली आहे. महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प (डब्ल्यूटीपी) आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) याच प्रभागात असल्याने नागरी सुविधांच्या दृष्टीनेही या परिसराचे महत्त्व वाढले आहे.
--------------
विकासासह वाढल्या अपेक्षा
प्रभागातील विकासकामांमध्ये लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे सध्या प्रभागाची जबाबदारी असल्याने नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. प्रतापनगर ते सिद्धेश्वर वन विहार या परिसरात झालेला विकास लक्षवेधी असला, तरी काही मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत.
-----------------
मोकाट जनावरे, पाणीटंचाईचे प्रश्न कायम
प्रभागाच्या विकासाला मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, अनियमित पाणीपुरवठा आणि बालकांसाठी तसेच युवकांसाठी क्रीडांगणांची कमतरता या समस्या बाधक ठरत आहेत. त्यामुळे विकासकामांसोबतच दैनंदिन नागरी सुविधांकडेही लक्ष देण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.
-------------------
कोट PNE26W29062
प्रभाग क्रमांक २३ मधील रस्त्यांमुळे शहराशी संपर्क अधिक सुलभ झाला आहे. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमुळे विकासाचा पाया मजबूत झाला आहे. मात्र, मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून या परिसराचा स्मार्ट प्रभाग म्हणून विकास व्हावा.
- मेनका राठोड, रहिवासी
------------------
कोट PNE26W29063
पाण्याची समस्या अजूनही कायम आहे. रस्त्यांमुळे ये-जा सुलभ झाली असली, तरी मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली होती. पाणीपुरवठा आणि मोकाट जनावरांचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने सोडवावा.
- संतोष वाघमारे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पुण्यातील CJP आंदोलकांचा मास्टर प्लॅन! पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आर्टिकल २२६ चा वापर; आता हायकोर्टाचे पोलिसांना थेट आदेश!

HDFC Bank CEO Salary: नव्या CEO ना मिळणार इतका पगार की RBI गव्हर्नरचं वेतनही वाटेल कमी! किती आहे संपूर्ण पॅकेज?

Marathi News Live Updates : सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

School Fee: फी नाही भरली, तर मुलीला शाळेत पाठवू नका; कोरेगावच्‍या शाळेचा अजब फतवा

Delhi CJP Protest CJPचा धसका! २५० रेल्वे रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद; ४५ हजार जवान तैनात, आंदोलकांची धरपकड

SCROLL FOR NEXT