पुणे

शहरातील रस्ते कामांना वेग

CD

डांबरीकरण, सिमेंट रस्त्यांसाठी पाच कोटींची कामे प्रस्तावित
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापुरात रस्ते विकासाला गती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते विकासाची मोठी कामे हाती घेण्यात आली असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत साधारण पाच कोटी रुपयांची विकासकामे महासभेपुढे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सभेच्या मंजुरीनंतर शहरातील या रस्ते कामांना गती मिळणार आहे.
शहरातील खराब रस्ते, अंतर्गत गल्ल्या तसेच मुख्य मार्गांचे डांबरीकरण आणि सिमेंट रस्ते उभारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत अंतर्गत सिटी पार्कजवळील इमाम मशीद चौक ते पोलिस कल्याण केंद्र, तसेच महावीर बंगला ते वाडिया हॉस्पिटल चौक या मार्गासाठी ७३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग २३ मध्ये विविध अंतर्गत रस्ते आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या रस्त्यांचे प्रस्ताव महासभेकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. या रस्ते कामांसाठीच्या निधीपैकी ३० टक्के हिस्सा महापालिकेला भरावा लागणार आहे.
------------------------------
या परिसरातील होणार कामे
केशवजी पवार घर ते लक्ष्मण कांबळे घर, काशीद घर ते माळी घर, नंदिनी नगर, नामजोशी विद्यालय परिसर, योगीराज नगर, आत्मविश्वास नगर, परशुराम नगर, आदित्य नगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, पाटील नगर, स्वामी विवेकानंद नगर, शिंगारे नगर आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांची कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. काही भागांमध्ये नव्याने सिमेंट रस्ते तर काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नीलेश लंकेंनी घेतलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT