पुणे

चला, शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षण विभागाची कार्यशाळा

CD

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, वर्गखोल्या, वीज सुविधा द्या
डॉ. महेश पालकर; ‘चला, शाळेत जाऊया’ अभियानातून गुणवत्तावाढीचा कृती आराखडा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : जिल्ह्यातील शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, वर्गखोल्या आणि वीज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी शाळांनी कृती आराखडा तयार करावा, असे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
‘चला, शाळेत जाऊया’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या कार्यशाळेत जिल्ह्यातील शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थीहिताच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, एससीआरटी उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी विशाल मुळे, शिक्षणाधिकारी (योजना) सुमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार ५ सप्टेंबरपासून हे अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध निर्देशांकांच्या आधारे शाळांची सद्यःस्थिती तपासून आवश्यक सुधारणा करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पर्यवेक्षकीय यंत्रणेने सातत्याने शाळांना भेटी देऊन केवळ प्रशासकीय कामकाज न पाहता शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. इब्राहिम नदाफ यांनी पीजीआय, परख व पॅटसह विविध शैक्षणिक निर्देशांकांच्या आधारे ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त केली.
शाळांमधील सुविधांच्या कमतरता दूर करण्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व निधीचा प्रभावी वापर करून प्रस्ताव सादर करावेत, तसेच गुणवत्तावाढीसाठी स्थानिक कृती आराखडा तयार करावा, यावरही कार्यशाळेत भर देण्यात आला. उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT