शहरातील पथदिवे आता सव्वासहाला लागणार!
सभापती श्रद्धा पवार यांच्या पाठपुराव्याला यश; आयुक्तांचे महावितरणला पत्र
सोलापूर, ता. १७ : हिवाळ्याची चाहूल लागताच दिवस लवकर मावळू लागले आहेत. सायंकाळी सहा वाजताच अंधार पडत असताना शहरातील पथदिवे मात्र सव्वासात वाजता सुरू होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील पथदिवे सायंकाळी ६.१५ वाजता सुरू करण्याबाबत महावितरणला पत्र दिले आहे. कामगार सभापती श्रद्धा पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
हिवाळ्यात दिवस लवकर मावळत असल्याने शहरातील रस्ते, चौक आणि अंतर्गत मार्गांवर अंधार पसरत होता. कामावरून घरी परतणारे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः वर्दळीच्या रस्त्यांवर पथदिवे वेळेत सुरू होत नसल्याने सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत होता. या समस्येची दखल घेत कामगार सभापती श्रद्धा पवार यांनी पथदिवे सुरू करण्याची वेळ बदलण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. हिवाळ्यातील बदलत्या सूर्यास्ताच्या वेळेनुसार पथदिवे सुरू होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी महावितरणला पत्र पाठवून सायंकाळी ६.१५ वाजता पथदिवे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पथदिवे वेळेत सुरू झाल्यास शहरातील रस्त्यांवरील अंधार दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.