पुणे

एनआयई आकाशकंदील कार्यशाळा

CD

PNE26W64322
एनआयई लोगो
.........
PNE26W64321, PNE26W64323

फोटोओळ :
सोलापूर : आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी ज. रा. चंडक प्रशालेचे विद्यार्थी. दुसऱ्या छायाचित्रात निर्मलाताई ठोकळ प्रशालेचे विद्यार्थी.

मुलांच्या हातून साकारले रंगीबेरंगी आकाशकंदील
सकाळ एनआयई अन्् स्व. दिगंबरबुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्टचा संयुक्त उपक्रम; स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : सकाळ एनआयई आणि स्व. दिगंबरबुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ज. रा. चंडक प्रशाला आणि निर्मलाताई ठोकळ प्रशालेत आकाशकंदील बनविणे व पणत्या सजविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागदांपासून आकर्षक आकाशकंदील तयार केले. तसेच मातीच्या पणत्यांना विविध रंग आणि नक्षीच्या माध्यमातून सजविले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक दिवाळी सजावटीचा अनुभव घेतला. ‘पहिल्यांदाच स्वतः आकाशकंदील बनवला असून, तो घरी लावणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि सकाळ एनआयईचे समन्वयक संदेश कुलकर्णी उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव संदीप कुलकर्णी यांनी संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कार्यशाळे दरम्यान घेण्यात आलेल्या आकाशकंदील स्पर्धेचे निकाल जाहीर करून विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. या उपक्रमासाठी मोहन घोडके, मुकुंद माळी, सचिन शेटके, महादेव कुंभार, अखिल शेख, पूनम पाटील आणि सोनम आरसिद यांनी सहकार्य केले.
--------------------------------
चौकट
आकाशकंदील स्पर्धेचा निकाल
ज. रा. चंडक प्रशाला
प्रथम : तृप्ती संतोष राठोड
द्वितीय : जानवी संतोष राठोड
तृतीय : संकेत प्रशांत हिरेमठ
--------------------------------
निर्मलाताई ठोकळ प्रशाला
प्रथम : संकल्प सकळेश्वर पुजारी
द्वितीय : प्रत्युषा विवेक सुरवसे
तृतीय : कावेरी बसवराज फागे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपर वापरूनही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर तुमची मागणी मागे घ्याल का? - अश्विनी वैष्णव

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT