सोलापुरातील तापमानात
मंगळवारी ०.३ अंशाने घट
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : सोलापूरच्या तापमानात आज (मंगळवारी) ०.३ अंश सेल्सिअसने घट झाली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. तापमानातील हा बदल स्थानिक वाऱ्यांमुळे असू शकतो. सोलापूरचे तापमान सोमवारी ४३.९ अंशांपर्यंत पोचले होते. मंगळवारी ४३.६ अंशांवर तापमान होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस सोलापूरचे कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सोलापूरचे एप्रिल महिन्यातील कमाल सरासरी तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसस असते. सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने तापमान वाढले तर त्याला ‘उष्णतेची लाट’ मानली जाते. याचाच अर्थ सोलापुरात सध्या उष्णतेची लाट नाही. रात्रीचे तापमान किमान तापमान २८.० अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने रात्रीदेखील हवा गरम असल्याने उकाडा मात्र कायम आहे.
...............
काय घ्यावी काळजी
कडक उन्हात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील उपाय अत्यंत आवश्यक आहेत. तहान लागलेली नसली तरीही पुरेसे पाणी प्या. ओआरएस लिंबू सरबत, ताक, शहाळे किंवा घरगुती पन्हे यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. यामुळे शरीरातील क्षार टिकून राहतात. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरयुक्त पेये टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. जर बाहेर जाणे अनिवार्य असेल, तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.