पुणे

शहर गुन्हेगारी

CD

४० हजारांचा ऐवज
कुलूप तोडून लंपास
सोलापूर : येथील न्यु बुधवार पेठेतील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील रोकड व दागिने, असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ४ मे रोजी मध्यरात्री चोरी झाल्याची फिर्याद रेखा दीपक जाधव यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. सध्याचे घर लहान असल्याने फिर्यादी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला आहेत. त्या दिवशी घर बंद करून भाड्याच्या घरी झोपायला गेल्यावर चोरट्याने चोरी केली. दुसऱ्या दिवशी घराचे कुलूप तुटलेले होते, घरातील रोकड व दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस हवालदार आरेनवरु तपास करीत आहेत.
------------------
दुचाकीच्या धडकेत
ज्येष्ठ महिला जखमी
सोलापूर : येथील मुख्य बसस्थानकाकडे जात असताना मागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने राधाबाई गोपीनाथ मस्के (वय ६८, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर) यांना जोरात धडक दिली. ९ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या अपघातात राधाबाई यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी पुजा धम्मपाल शिंदे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून दुचाकीस्वार सचिन नागनाथ वाकसे (रा. सलगरवाडी, डोणगाव रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार भद्रशेट्टी तपास करीत आहेत.
--------------
स्फोटात कामगार जखमी;
दुकान मालकाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : स्फोटक पदार्थामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असतानाही सहारा गन हाऊस दुकानाचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले (रा. देशमुख मळा, अकलूज, ता. माळशिरस) यांनी पुरेशी खबरदारी घेतली नाही. ११ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारमध्ये स्फोटक पदार्थ भरताना मुरारजी पेठेत स्फोट झाला. यात दुकान मालकाने अविचाराने, निष्काळजीपणे कामगार केदार सिद्धप्पा छत्रे यांना स्फोटक हाताळायला दिले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. त्या स्फोटात छत्रे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील यांच्या फिर्यादीनुसार दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत.
----------------------
बस स्थानकाजवळून
दुचाकी पळविली
सोलापूर : येथील बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या गेटजवळ लावलेली दुचाकी (एमएच १३, ईएन ८०४०) चोरट्याने चोरुन नेली आहे. १० मे रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद ज्ञानेश्वर शरणप्पा बनसोडे (रा. सम्राट चौक, न्यु बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.
----------------
मरिआई चौकातून
दुचाकीची चोरी
सोलापूर : येथील गवळी वस्तीजवळील मरिआई चौक परिसरातील घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच १३, बीटी ९१२१) चोरट्याने चोरुन नेली आहे. १५ मार्चच्या रात्री दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद जमीर रफिक दखनी यांनी मंगळवारी (ता. १२) फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिस हवालदार परीट तपास करीत आहेत.
----------------
दुचाकीच्या धडकेत
कामगार जखमी
सोलापूर : येथील न्यु बुधवार पेठेतील मसरे टाऊनशीप येथील सेंट्रिंगचे काम संपवून अंगत झुंबर धागतोडे (वय ४५, रा. न्यु बुधवार पेठ) हे कारंबा नाका ते तुळजापूर नाका रोडने पायी घरी येत होते. त्यावेळी भरधाव दुचाकीस्वाराने (एमएच ०५, ईडी १२७८) त्यांना जोरात धडक दिली. हा अपघात ११ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला होता. दुचाकीस्वाराच्या धडकेत काका गंभीर जखमी झाल्याची फिर्याद सागर संजय सदाफुले यांनी मंगळवारी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT