पुणे

सिव्हिल संक्षिप्त

CD

संगमेश्वर नगरातील
महिलेची आत्महत्या
सोलापूर : येथील संगमेश्वर नगरातील राहत्या घराच्या लाकडी वाशाला दोरीच्या सहाय्याने कल्याणी परमेश्वर गेजगे (वय ३५, रा. हुबळी, जि. कलबुर्गी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. १९ मे रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास कल्याणी यांनी गळफास घेतला होता. गळफासातून खाली उतरवून त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी कल्याणी गेजगे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
-----------------
जागेच्या वादातून
चौधरी मसलेत मारहाण
सोलापूर : जागेच्या वादातून आकाश पवार, अर्जुन पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी मिळून सरदार भिमराव पवार (वय ४२, रा. चौधरी मसले, ता. मोहोळ) यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात सरदार यांच्या सर्वांगास मुकामार लागला आहे. सोमवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास गावातच घराजवळ ही मारहाण झाली होती. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना मेव्हण्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
---------------
शेतातील लाईटवरून
तिघांकडून मारहाण
सोलापूर : शेतीसाठी वीजेचे कनेक्शन घेत असताना मोहीन धबाले, जमीर धबाले, शमीर धबाले यांनी मिळून नजीर अहमद शब्बीर मुल्ला व सुबेदार मुल्ला (दोघेही, रा. वांगी, ता. दक्षिण सोलापूर) या दोघांना मारहाण केली. मंगळवारी (ता. १९) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही मारहाण झाली असून यात जखमींना मंद्रुपच्या सरकारी रुग्णालयातून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर नजीर व सुबेदार यांच्या मारहाणीत मोहसीन हसन धबाले हा देखील जखमी झाला आहे.
------------
‘सिव्हिल’मध्ये दाखल
आजीबाई पळून गेल्या
सोलापूर : तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील अनिता अनिल घोडके (वय ६९) या घरी चक्कर येऊन पडल्या होत्या. यात त्यांच्या डोक्याला, कमरेला मार लागला होता. त्यांना सोमवारी (ता. १९) सकाळी सव्वादहाच्या सुमरास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, दुपारी दोनच्या सुमारास त्या रुग्णालयात आढळल्या नाहीत. त्या पळून गेल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
-----------
शेतीच्या रस्त्यावरून
तरुणास बेदम मारहाण
सोलापूर : शेतीला जायच्या रस्त्यावरून किरण तानाजी घोडके (रा. कुरुल, ता. मोहोळ) यास शिवाजी शंकर घोडके याने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात किरणच्या सर्वांगास मुकामार लागला असून उपचारासाठी त्याला कामतीच्या सरकारी रुग्णालयातून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर किरण घोडके, तानाजी घोडके यांच्या मारहाणीत जखमी शिवाजी घोडके यांनाही ‘सिव्हिल’मध्येच दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT