पुणे

विद्यापीठातील भूमिपूजन

CD

SLC26B28269
फोटो ओळ :
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ येथे पीएम उषा विभागाच्या मंजूर निधीतून उभारण्यात कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल इमारतींचे भूमिपूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर आदी.
----------------------------
विद्यापीठाच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर विशेष सहकार्य
जिल्हाधिकारी आशीर्वाद; पीएम उषा अंतर्गत विज्ञान संकुल इमारतीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर जिल्ह्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच विविध विकासात्मक प्रस्तावांसाठी शासन स्तरावरून विशेष सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
शनिवारी, विद्यापीठ परिसरात पीएम उषा विभागाच्या मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल या दोन अत्याधुनिक इमारतींचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते.
यावेळी आशीर्वाद यांनी सांगितले की, कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आणि विकासात्मक प्रस्तावांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाला नेहमीच सहकार्य राहील.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू महानवर म्‍हणाले, ‘पीएम उषा अंतर्गत मंजूर निधीमुळे विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कला, ललित कला आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत संशोधन व कौशल्याधारित शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. महादेव खराडे, गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, डॉ. गौतम कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व स्वागत पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT