पुणे

परीक्षेच्या पाऊणतास आधी प्रश्नपत्रिका केंद्रांवर

CD

(विद्यापीठाचा लोगो घ्यावा)
-----------
परीक्षेच्या पाऊणतास आधी प्रश्नपत्रिका केंद्रांवर
पेपरफुटीवर विद्यापीठाचा उपाय; केंद्रांवरील ‘सीसीटीव्ही’चे कंट्रोल विद्यापीठाकडे

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : देशभरात पेपरफुटीची प्रकरणे समोर येत असताना, परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पाऊणतास आधी सर्व परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या ई-मेलवर प्रश्नपत्रिका पाठविल्यानंतर परीक्षार्थींच्या संख्येनुसार त्याच्या प्रती काढून वेळेत वाटप करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांवर असणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार २२ ऑक्टोबरपासून सत्र परीक्षा सुरू होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची १२ संकुले असून, विद्यापीठाशी ११५ महाविद्यालये संलग्नित आहेत. या महाविद्यालयांमध्ये सुमारे ६० ते ६२ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. याशिवाय सहा ते आठ हजार रिपीटर विद्यार्थीही परीक्षा देतात. परीक्षा पारदर्शक व्हावी अन् कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात येणार आहेत.
महाविद्यालयांना संबंधित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आयपी ॲड्रेस विद्यापीठाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे केंद्रांवरील सीसीटीव्हीचे नियंत्रण विद्यापीठाकडे राहणार आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी लिक होऊ नये, यासाठी प्रश्नपत्रिका पाठविण्याच्या पद्धतीबाबत विद्यापीठाकडून गोपनीयता बाळगली जात आहे.
---
परीक्षेच्या तारखेबाबत संभ्रम
दिवाळी आठ दिवसांवर असताना २२ ऑक्टोबरपासून परीक्षा घ्यायची की दिवाळीनंतर परीक्षा सुरू करायची, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ८ ऑक्टोबरपासून होणारी परीक्षा २२ ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता त्यात पुन्हा बदल झाल्यास तो दुसऱ्यांदा केलेला बदल ठरणार आहे. यासंदर्भातील घोषणा दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. तूर्तास, आगामी सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १९ ऑक्टोबरपर्यंत आहे.
---
तरी विद्यापीठ घेतेय लेट फी
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. शासनाकडून परीक्षा शुल्कमाफीचा निधी प्राप्त होताच विद्यापीठाच्या १२ संकुलांमधील अन् संलग्नित महाविद्यालयांतील सुमारे ६२ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची रक्कम परत दिली जाणार आहे. मात्र, शासनाने दुष्काळामुळे परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला असतानाही विद्यापीठाकडून परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून लेट फी अन् सुपर लेट फी (विलंब व अतिविलंब शुल्क) आकारली जात आहे.
-----------
कोट: PNE26W55455
- विद्यापीठाची सत्र परीक्षा २२ ऑक्टोबरपासूनच सुरू करण्याचे नियोजन आहे. परीक्षेत गैरप्रकार होणार नाहीत, याची खबरदारी विद्यापीठाने आधीच घेतली आहे. दिवाळीपूर्वी परीक्षा सुरू झाल्यास सुट्ट्यांमध्ये उत्तरपत्रिका तपासता येतील. दिवाळी सुट्ट्यानंतर पुन्हा राहिलेल्या अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT