पुणे

युवा महोत्सवामुळे विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली

CD

विद्यापीठाचा लोगो घ्यावा

युवा महोत्सवामुळे विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली
पहिली सत्र परीक्षा महोत्सवानंतर; १५ ऑक्टोबरपासून अभियांत्रिकी, फार्मसीचे पेपर

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २२ वा युवा महोत्सव बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात होणार आहे. २८ सप्टेंबरपासून महोत्सवाला सुरुवात होणार असून विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा २९ सप्टेंबरपासून घेण्याचे नियोजित होते. मात्र, महोत्सवामुळे सत्र परीक्षा पुढे ढकलली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून अडीच महिन्यांपूर्वीच परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक वेबसाईटवर टाकले आहे. मात्र, युवा महोत्सवामुळे आता सत्र परीक्षा एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. महोत्सवानंतर विद्यार्थ्यांना चार ते पाच दिवस अभ्यासासाठी दिले जाणार आहेत. दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने सध्या परीक्षा फॉर्म, हॉल तिकीट, विद्यार्थ्यांची पात्रता, निकाल, फोटोकॉपी अशा सर्व बाबी ऑनलाइन केल्या आहेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपरही ऑनलाइनच तपासले जातात. यामुळे परीक्षेनंतर १५ ते २० दिवसांत निकाल जाहीर होतील, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी व्यक्त केला आहे. निकाल वेळेत लागल्याने विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ राज्यात पहिल्यांदा सोलापूर विद्यापीठाचा झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होईल आणि १५ ऑक्टोबरपासून अभियांत्रिकी व फार्मसीचे पेपर होतील, असेही परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

कोट :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालयात होणार आहे. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव होणार आहे. महोत्सवात सहभागासाठी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मागच्या वर्षी ५८ महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग नोंदवला होता, यंदा ही संख्या वाढेल, अशी आशा आहे.
- डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सोलापूर

चौकट
प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही
अन्‌ विद्यापीठात स्ट्राँग रूम
परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून विद्यापीठाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर (महाविद्यालय) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन घातले आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही असणार आहेत. परीक्षेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठात स्ट्राँग रूम असणार आहे. त्या ठिकाणी विद्यापीठाचे एक पथक नेमले जाणार आहे.

सत्र परीक्षेची स्थिती
संलग्नित महाविद्यालये
११५
परीक्षा केंद्रे
११०
एकूण परीक्षार्थी
७२,०००
एकूण अभ्यासक्रम
४२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT