६१२२४
सोलापूर : सिद्धेश्वर प्रशाला मतदान केंद्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन.
६१२२७
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली मतदानासाठी एकत्र आलेले शिक्षक व पदवीधर.
६१२२९
सोलापूर : नूमवि केंद्रावर एकत्र आलेले आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख.
मतदारांसाठी नेते पोहोचले मतदान केंद्रांवर
विधान परिषद निवडणूक : ऑक्टोबर हिट असतानाही उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान झाले. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांची यंत्रणा कमालीची कार्यान्वित झाली होती. मतदानाची स्थिती पाहण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह अनेक नेते मतदान केंद्रांवर ठिय्या मांडून होते. आज उन्हाचा कडाका तीव्रतेने जाणवत होता, तरीही मतदारांचा उत्साह कायम होता. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः सोलापूर शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सिद्धेश्वर प्रशालेतील मतदान केंद्रावर त्यांनी व्यवस्था व मतदान प्रक्रियेची पाहणी केली. शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सपाटे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सिद्धेश्वर प्रशालेसह शहरातील विविध केंद्रांवर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली व जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी येण्यास प्रोत्साहन दिले.
१७०० मतदारांचे एकत्रित मतदान
माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांच्या संस्थेतील १ हजार ७०० पदवीधर व शिक्षक मतदारांचे एकत्रित मतदान करून शक्तिप्रदर्शन केले. ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या संपर्क कार्यालयात सकाळी आठ वाजता सर्व मतदार एकत्र आले. त्यांना मतदान केंद्र, मतदान करताना घ्यावयाची काळजी व ओळखपत्रासंदर्भात सूचना दिल्या. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार एकत्र आल्याने काही वेळ मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. युवा वर्ग भाजपच्या पाठीशी असून हे दोन्ही उमेदवार निश्चित विजयी होतील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी व्यक्त केला.
चौकट...
‘नूमवि’ केंद्रावर दोन्ही देशमुख एकत्र
सोलापुरातील नूतन मराठी विद्यालयातील मतदान केंद्रावर आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख एकत्र आले होते. मतदानाच्या स्थितीची माहिती दोघांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आमदार विजयकुमार देशमुख यांनी नॉर्थकोट प्रशालेच्या मतदान केंद्राला भेट देऊन मतदानाच्या स्थितीची पाहणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल व सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील मतदान केंद्रांना भेट दिली. या ठिकाणी भाजप नगरसेवक अनंत जाधव यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.