पुणे

प्रभाग २० : वास्तव वेध

CD

वास्तव वेध
प्रभाग २० :

PNE26W43419 -
सोलापूर : प्रभाग २० मध्ये जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.

१० हून अधिक नगरांत रस्ते, जलवाहिनी कामांना सुरुवात
हद्दवाढ भागातील सुविधांचा अनुशेष कायम; शाळा, आरोग्य केंद्रासाठी महापालिकेच्या जागा वापरण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : नई जिंदगीसह शहराच्या हद्दवाढ भागातील प्रभाग २० मधील अनेक नगरांमध्ये आजही अंतर्गत रस्ते, जलवाहिनी, पथदिवे व नियमित पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांचा अनुशेष कायम आहे. एमआयएमची सत्ता असलेल्या या प्रभागात भांडवली निधीतून विकासकामे केली जात आहेत. नवीन पाण्याची टाकी, स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र व शाळेची मागणी अद्याप कागदावरच असल्याचे नगरसेवक सांगतात. दरम्यान, इतर प्रभागांप्रमाणे सुविधा आम्हाला कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रभागातील अनेक नगरांमध्ये आजही कच्चे रस्ते आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे व मालकी हक्कावरून वाद असल्याने रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे ही कामे प्राधान्याने करण्याचे नियोजन आहे. दीक्षित नगर, शोभादेवी नगर, भूदेवी नगर, पाटील नगर, गज्जम नगर, भीमाशंकर नगर २, अंबिका नगर, विष्णू नगर व माहेश्वर नगर या नगरांमध्ये मागील १५ वर्षांत रस्ते झालेले नाहीत. तसेच सुमारे २० वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या लहान असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मिळालेल्या निधीतून रस्ते व जलवाहिन्या बदलण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
----------------------------------
नोटरीवर खरेदी केलेल्या जागांच्या नोंदीचा मार्ग मोकळा
प्रभागात अनेक ठिकाणी प्लॉटची खरेदी नोटरी पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावर आजही मूळ जमीनमालकाचे नाव असल्याने अनेकांना बँकेचे कर्ज काढणे, जागेची खरेदी-विक्री करणे तसेच मनपाकडून बांधकाम परवाना मिळविण्यात अडचणी येत होत्या. नगरसेवकांच्या पाठपुराव्यानंतर आयुक्तांनी लक्ष घालून विशेष शिबिर घेतले. नोटरी पद्धतीने झालेल्या खरेदीची आवश्यक परवानगी घेऊन संबंधितांना पीआर कार्ड (मालमत्ता पत्रक) देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. एसआयआर मोहिमेमुळे या कामात खंड पडला असला तरी पुढील आठवड्यात पुन्हा काम हाती घेण्यात येणार असल्याचे नगरसेवक अझर जहागीरदार यांनी सांगितले.
-----------------------
प्रभागात रस्ते, ड्रेनेजला मंजुरी
चारही नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने रस्ते, ड्रेनेज व जलवाहिनीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. काही कामे सुरूही झाली आहेत. मात्र अनेक नगरांमध्ये पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने स्वतंत्र जलवाहिनीची मागणी आहे. त्यासाठी जागेची पाहणीही करण्यात आली आहे; मात्र महापालिकेकडून पुढील प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून ही पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
-------------------------------
महापालिका मालकीच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे. शहराच्या हद्दवाढ भागात, विशेषतः नई जिंदगी व परिसरात महापालिकेच्या मोठ्या जागा आहेत. मात्र या ठिकाणी हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी अद्याप सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. या जागांवर शिक्षण व आरोग्य विभागाच्या सुविधा निर्माण कराव्यात. महापालिकेचे उत्पन्न नक्कीच वाढवावे; मात्र त्यासोबत या जागांचा नागरिकांसाठीही वापर करावा.
- अझर जहागीरदार, नगरसेवक, एमआयएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT