पुणे

टंचाई कृती आराखड्यामध्ये २४६ गावे व ५९९ वाडया-वस्त्यां

CD

टंचाई आराखड्यात जिल्ह्यातील २४६ गावे, ५९९ वाड्या-वस्त्यांचा समावेश
पाणीपुरवठ्यासाठी १४० कोटींची तरतूद; सीईओ कुशल जैन यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : जिल्ह्याच्या २०२५-२६ या वर्षातील टंचाई कृती आराखड्यात २४६ गावे आणि ५९९ वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला असून, या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी १४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
२०२३-२४ च्या टंचाई कालावधीत २१४ टँकरद्वारे १८० गावांतील १,२७३ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर २०२४-२५ या कालावधीत ६९ टँकरद्वारे ५९ गावांतील ५८७ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता.
२०२५-२६ या वर्षासाठी १७८ टँकरद्वारे १४७ गावांतील ५८९ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मार्चअखेर ४८ टँकर प्रस्तावित होते; मात्र एकाही टँकरची मागणी प्राप्त झाली नव्हती. ११ एप्रिलपासून उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे टँकर सुरू करण्यात आला आहे. तसेच अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईकनगर, बार्शी तालुक्यातील भोयरे व पिंपरी, तसेच माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ या गावांसाठी चार टँकर प्रस्तावित आहेत.
२०२५-२६ च्या टंचाई कालावधीत टँकर भरण्यासाठी एकूण ५१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यात ११ सार्वजनिक व ४० खासगी पाणीस्रोतांचा समावेश आहे. २०२४-२५ या टंचाई कालावधीसाठी शासनाकडे ८.१७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, तो अद्याप प्राप्त झालेला नाही.
दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता
२०२५-२६ टंचाई कालावधीत नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीअंतर्गत भोसे (ता. मंगळवेढा), ३९ गावे प्रादेशिक योजना कासेगाव आणि ११ गावे प्रादेशिक योजना (ता. पंढरपूर) या योजनांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. संबंधित दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सीईओ जैन यांनी सांगितले.
सुट्टीच्या दिवशीही सीईओंची गावभेट
रविवारी सुट्टीच्या दिवशीही सीईओ कुशल जैन यांनी बार्शी तालुक्यातील पानगाव येथे भेट देऊन पाण्याचे स्रोत, पाण्याच्या टाकीची कामे तसेच कडक उन्हामुळे ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत आढावा घेतला. तसेच आरोग्य केंद्रांना भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. उप अभियंता वाघमारे यांनी पाणीपुरवठा विषयक कामांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT