पुणे

तापमानाची बातमी

CD

कधी कोकणातला दमटपणा तर कधी विदर्भातील चटका!
सोलापूरच्या वातावरणाची तऱ्हा; पारा घटण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : कोकणात जाणवणारा दमटपणा, विदर्भातील कडक उन्हाचा चटका आणि अधूनमधून ढगाळ वातावरण अशा संमिश्र हवामानाचा अनुभव गेल्या आठवडाभरापासून सोलापूरकर घेत आहेत. वातावरणातील आर्द्रतेत सातत्याने होत असलेल्या चढउतारांमुळे कधी प्रचंड उकाडा, तर कधी अंगाची लाहीलाही करणारे ऊन जाणवत आहे. शनिवारी सोलापुरात कमाल ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीच्या तुलनेत तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

दरम्यान, मॉन्सूनने शनिवारी अंदमानमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाने दिली. येत्या काही दिवसांत मॉन्सून आणखी पुढे सरकेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोलापुरातील तापमानात आता हळूहळू घट होण्याची शक्यता असून, २२ मेपर्यंत तापमान सुमारे ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नदी-नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र, यंदा मे महिन्यात तापमानाचा पारा सरासरी ४१ अंश सेल्सिअसच्या आसपासच कायम राहिला आहे. उन्हाळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, सोलापुरात मॉन्सूनचा पाऊस कधी दाखल होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यंदा ८ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होणार आहे.
---
कोट
- वातावरणातील सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. कधी उन्हाचा चटका, कधी ढगाळ वातावरण, कधी दमटपणा असे वातावरणात सातत्याने बदल होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मधुमेह, रक्तदाब यासह इतर इतर आजाराच्या रुग्णांनी काळजी घ्यावी. उन्हात शक्यतो बाहेर पडू नये.
- डॉ. अमरदीप कंदले, सोलापूर
---
आकडे बोलतात...
अशी राहिली आद्रर्ता, (आकडे टक्केवारीत)
ता. ९ : ३४
ता. १० : २७
ता. ११ : ३१
ता. १२ : ५१
ता. १३ : ४२
ता. १४ : ३३
ता. १५ : २९
ता. १६ : २६
---
असे राहिले कमाल तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये)
ता. ९ : ३९.७
ता. १० : ४१.६
ता. ११ : ४२.३
ता. १२ : ४१.८
ता. १३ : ४१.१
ता. १४ : ४२.४
ता. १५ : ४१.४
ता. १६ : ४३.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT