पुणे

दुष्काळात प्रत्येक गावात ‘रोहयो’तून पाच विहिरी

CD

लोगो : सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
---
दुष्काळात प्रत्येक गावात ‘रोहयो’तून पाच विहिरी
जिल्ह्यात ५१२० विहिरी होणार; जॉब कार्ड असलेल्यांना दररोज ३१७ रुपये मजुरी
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाच विहिरी रोजगार हमी योजनेतून होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी पाच हजार १२० विहिरींचे उद्दिष्ट असून, सर्व विहिरी मजुरांकडून पाडल्या जातील. यात मजुरांना प्रतिदिन ३१७ रुपयांची मजुरी मिळणार आहे.
दुष्काळात सामान्य लोकांना रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडायला लागू नये म्हणून आता प्रत्येक गावात रोजगार हमीतून विहिरी पाडल्या जाणार आहेत. ८ मीटर रुंद आणि १५ मीटर खोल अशा या विहिरी असणार आहेत. यासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. विहिरीचे काम करताना ब्लास्टिंग करण्यासाठी व क्रेन लावायला परवानगी असणार आहे. प्रत्येक मजुराच्या हाताला तेथे सलग तीन महिने काम मिळणार आहे. तत्पूर्वी, गरजू लाभार्थींची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून होईल. ज्या लाभार्थीला खरोखर विहिरीची गरज आहे, त्यांचीच निवड ग्रामसभेतून अपेक्षित आहे. प्रत्येक गावात पाच विहिरी झाल्यास त्या गावातील ५०० ते ७०० लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. या विहिरीतून प्रत्येक मजुराला तीन महिन्यांत ८५ ते ९० हजार रुपये मिळणार आहेत.
---
जिल्ह्यातील ‘रोहयो’ची स्थिती
एकूण ग्रामपंचायती
१,०२४
प्रत्येक गावात विहिरी
५
‘रोहयो’तून होणाऱ्या विहिरी
५,१२०
प्रत्येक विहिरीसाठी अनुदान
५ लाख रुपये
---
चौकट
ॲपद्वारे ऑनलाइन हजेरीचे बंधन
शासनाच्या ‘नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिम’ या ॲपद्वारे रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांची दररोज हजेरी नोंदविण्याचे बंधन आहे. यात प्रत्येक मजुराचे लोकेशन टिपले जाते. याशिवाय ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव पंचायत समितीकडे गेल्यावर ‘बीडीओ’ मंजुरी देतात. तेथून तो प्रस्ताव ‘रोहयो’च्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे येतो. तेथून मंजुरी मिळाली की ग्रामपंचायतीच्या लॉग-इनवर तो लाभार्थी दिसतो. तेथे ग्रामसेवकांकडून मंजुरी मिळाल्यावर अंदाजपत्रकास मान्यता मिळेल. त्यानंतर तांत्रिक, प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दिले जातात. त्यानंतर लाभार्थी जेथे विहीर घेणार आहे, त्या ठिकाणाचे ‘युक्तधारा’ पोर्टलवर जिओ टॅगिंग होते. त्यावेळी पूर्वी त्या क्षेत्रात जुनी विहीर आहे का, जुन्या विहिरीचे नव्याने काम होत आहे का हे समजते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

Emergency Alert: ब्रिटन, अमेरिकेनंतर जपानही अलर्ट मोडवर! घरात ३ दिवसांचा अन्न-पाण्याचा साठा करा; नेमका धोका काय?

UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२७ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : श्रीमंत सरदार वाघ घराण्याच्या बोधचिन्हाचे आसले येथे उत्साहात अनावरण; दरवर्षी मेळावा घेण्याचा संकल्प

SCROLL FOR NEXT