पुणे

सोलापूर-साप्ताहिक समालोचन

CD

सोलापुरात रानमेव्याला उठाव; करवंद, जांभूळच्या दरात वाढ

सुदर्शन सुतार : ॲग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात करवंद, जांभूळ आणि खरबूजाची आवक चांगली राहिली. गेल्या काही दिवसांतील चढ-उतारानंतर या सप्ताहात आवकेसोबतच दरातही सुधारणा दिसून आली. विशेषतः करवंद आणि जांभळासारख्या रानमेव्यांना ग्राहकांकडून चांगला उठाव मिळाला.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात करवंदाची दररोज ५ ते १० क्विंटल, जांभळाची ७ ते १२ क्विंटल, तर खरबूजाची ५० ते ८० क्विंटलपर्यंत आवक झाली. ही सर्व फळे प्रामुख्याने स्थानिक भागातून दाखल होत आहेत. स्थानिक पुरवठ्यामुळे ग्राहकांना ताजा रानमेवा उपलब्ध होत आहे.

दराच्या बाबतीत करवंदाला प्रतिक्विंटल किमान ५ हजार, सरासरी ६ हजार आणि कमाल ८ हजार रुपये दर मिळाला. आरोग्यदायी गुणधर्मांमुळे जांभळाला शहरी भागात मोठी मागणी असून, त्याला किमान ८ हजार, सरासरी १५ हजार आणि कमाल १९ हजार रुपये दर मिळाला. कडक उन्हाळ्यामुळे मागणीत असलेल्या खरबूजाला प्रतिक्विंटल किमान १ हजार, सरासरी २ हजार आणि कमाल ४ हजार रुपये दर मिळाला. या फळांबरोबरच हापूस आंब्याचीही दररोज १ ते २ गाड्यांपर्यंत आवक झाली. दर्जा आणि ग्रेडनुसार हापूस आंब्याच्या डझन पेटीला किमान ४००, सरासरी २८०० आणि कमाल ४५०० रुपये दर मिळाला.

चौकट
पालेभाज्यांच्या दरात वाढ
उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईमुळे मेथी, शेपू आणि कोथिंबीर या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दररोज केवळ १० ते १५ हजार पेंढ्यांची आवक होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, बाजारात पालेभाज्यांच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रति शंभर पेंढ्यांसाठी मेथीला १२०० ते १६०० रुपये, कोथिंबिरीला १३०० ते १८०० रुपये, तर शेपूस १००० ते १४०० रुपये दर मिळाला. एकूणच, गतसप्ताहात कमी आवक आणि वाढती मागणी यामुळे भाजीपाल्यांच्या दरात तेजी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

SCROLL FOR NEXT