परिंचे,ता. २४ : स्नेहांकूर द रे ऑफ होप, पुणे व रिम्यूनन्स सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर (ता.पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालय सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण झाले. पर्यावरणपूरक ऊर्जा वापर आणि ऊर्जा स्वावलंबनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यालयासाठी तसेच परिसरासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या प्रकल्पामुळे विद्यालयाच्या वीज गरजा मोठ्या प्रमाणात भागविण्यात येणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार, स्नेहांकूर द रे ऑफ होप पुणे या संस्थेच्या अध्यक्षा ॲड. वृषाली दातार, जयप्रकाश दातार, अभिजित दातार व श्रीराम फडके यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. प्रकल्पाबद्दल ॲड. वृषाली दातार यांनी सौरऊर्जा प्रणालीची तांत्रिक माहिती सादर करताना पॅनेलची क्षमता, इन्व्हर्टर प्रणाली, सुरक्षा उपाययोजना आणि देखभाल प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अक्षय ऊर्जेबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळणार असून विज्ञान व पर्यावरण विषयांबाबत अधिक जागरूकता निर्माण होणार असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणावर आधारित घोषवाक्ये सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी तर संस्थेचे समन्वयक व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.