पुणे

सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाख रुपयांची फसवणूक

CD

घोडेगाव, ता. ८ : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल आणि सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सात नागरिकांची १२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र महादेव बोऱ्हाडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लक्ष्मण मनाजी काचोळे (वय ६७, रा. पिंपळगाव घोडे, आता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोऱ्हाडे याने सूर्यघर योजनेतून ७८ हजार रुपये सबसिडी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले, मात्र काम पूर्ण केले नाही. तपासात समोर आले की, बोऱ्हाडे याने केवळ काचोळे यांचीच नव्हे, तर महेश ढमढेरे (४.०८ लाख), भारती जाधव (२.३६ लाख), भिवाजी लांडे (१.७१ लाख), अतुल भवारी (१.३० लाख), सुनील झोडगे (८२ हजार) आणि राजाराम साळवे (४६ हजार) अशा एकूण सात जणांकडून १२ लाख ४४ हजार २७४ रुपये उकळले. ही रक्कम रोख स्वरूपात, तसेच गुगल पे आणि फोन पेद्वारे घेण्यात आली होती.
या योजनेच्या नावाखाली आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पवार पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Creta Car Accident : दुचाकीला धडकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळली क्रेटा, सासू सुनेचा मृत्यू; १३ तासानी गाडी काढली बाहेर

Navi Mumbai News: भुयारी मार्गात अडथळा, मोरबे जलवाहिनी हलवणार; कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

SCROLL FOR NEXT