Solar set is given to villagers of Murrah Kharbala house in remote area of ​​Temghar 
पुणे

दुर्गम मुऱ्हा खरबला येथे घराघरात पसरला सौरप्रकाश; ग्रामस्थ झाले खुश

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : टेमघर (ता.मुळशी) येथील दुर्गम भागातील मुऱ्हा खरबला घराघरात सौर संच
आले आणि ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला. भर पावसाळा आणि आखाड महिन्यात प्रकाशाची सोय झाल्याने परिसरात सर्वत्र लख्ख उजेड पसरला असून दिवाळी अवतरली आहे. मोबाईल चार्जींगचीही मोठी सोय झाल्याने संपर्कही सोपा झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दैनिक सकाळने येथील नागरिकांचे वीजेअभावी होत असलेल्या हलाखीच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध केल्या होत्या. सौर यंत्रणा थेट घरात आल्याने येथील ग्रामस्थ सध्या जाम खूश आहेत. गेली अनेक वर्षे ही वस्ती अंधारातच राहिल्याने ग्रामस्थांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. सकाळच्या वृत्तानंतर भरे येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचवेळी तातडीने सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली होती. सकाळ व ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महाऊर्जा (मेडा) च्या माध्यमातून येथील वस्तींतील प्रत्येक कुटुंबाला मोफत सौर संच मिळाले आहेत. उपसरपंच सचिन मरगळे यांनी रात्रीचा दिवस करून वारंवार या विषयाचा मोठा पाठपुरावा केला होता.


Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

मुऱ्हा येथे सव्वीस तर खरब येथे आठ असे एकूण चौतीस सौर संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. १२ व्होल्टची बॅटरी, तीन बाय चार फूट आकाराचे सोलर पॅनेल, सात वॅटचे पाच एलईडी बल्ब, एक टेबल फॅन, मोबाईल चार्ज करण्यासाठी युएसबी व पॅनल बसविण्यासाठी एक लोखंडी खांब असा संच प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर उभारण्यात आला आहे. सुमारे पन्नास हजार रुपयांचा हा संच बसविल्याने विजेचे कोणतेही बील न भरता सौर शक्तीवर चालणाऱ्या या दिव्यांमुळे अवघी वस्ती आता उजाळून निघाली. गेली तीन दिवस येथील प्रत्येक घरासमोर हा सौर संच बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

यावेळी सरपंच रेणुका मरगळे, उपसरपंच सचिन मरगळे, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई मरगळे, धोंडिबा मरगळे, माजी उपसरपंच बिरू मरगळे, मारुती मरगळे, संतोष झोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सचिन मरगळे म्हणाले, "सध्याच्या योजनेमुळे प्रकाश आला, मोबाईल चार्जींगचीही मोठी सोय झाली परंतु या ठिकाणी पावसाचे मोठे प्रमाण असल्याने सूर्य किरणांचा अभाव असतो त्यामुळे येथे वीज वितरण कंपनीने खांब व तारांच्या माध्यमातून कायमस्वरुपी वीज उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे."

पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), मेडाच्या विभागीय कार्यालयातील प्रकल्प अधिकारी नितीन जाधव म्हणाले, " केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ' (सौभाग्य) योजने अंतर्गत ज्या भागात विजेचे खांब पोचलेले नाहीत त्याठिकाणी सौर संच बसविण्यात येतात. त्याअंतर्गत मुऱ्हा खरब हा दुर्गम भाग असल्य़ाने सध्या तेथे वीज पोचली नाही त्यामुळे तेथे या सौर दिव्यांची व्यवस्था केली आहे. राज्य विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून त्याची शिफारस केली जाते. या योजनेअंतर्गत संपूर्ण मोफत सौर संच बसविले जातात. प्रामुख्याने आदिवासी , दारिद्यरेषेखालील, दुर्गम भागातील कुटुंबांना याचा लाभ घेता येतो. तेथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचे सर्वेक्षण केलेले असते."

व्यवस्थापक अनिल जोशी म्हणाले, "पुणे जिल्ह्यात यावर्षी २१८ सौर संच बसविलेले आहेत. हवेली तालुक्यात ६०, आंबेगावमध्ये ५९, मुळशीत ३४, वेल्हे तालुक्यात ५८ तर, भोर तालुक्यात ७ सौर संच बसविण्यात आलेले आहेत."

भरे येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड म्हणाले,
"वनविभागाच्या जमिनीतून गेलेला रस्ता आणि दुर्गम भाग आदींमुळे या वस्तीला वीजेचे खांब पोचविणे तांत्रिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्याही अडचणीचे ठरलेले आहे. त्यामुळे सध्या येथे सौर दिव्यांची सोय केली असून लवकरच तेथे विजेची कायमस्वरुपी सोय करणार आहोत." मुळशी तालुक्यातील मुठा खोरे व मोसे खोऱे या दोन खोऱ्यांच्या सीमेवर असलेली ही वस्ती असून लगतच्या लवासा सिटीला विजेचा झगमगाट असताना विजेविना कायम अंधारातच असते. ही वस्ती गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असून हा भाग दुर्गम व दऱ्याखोऱ्याचा आहे. पावसाचे प्रमाण खूप असून दळणवळणाची साधने नाहीत. या वस्तीत सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबे राहत असून लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे. या वस्तीत सध्या वयोवृद्धांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आजारांचे प्रमाणही मोठे असते. परिसरात घनदाट जंगल असून हिंस्त्र पशूंचा वावर असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण खूप आहे. वीजेअभावी या हिंस्त्र प्राण्यांचा त्रास होतो. बऱ्याचदा जीवितहानीही होते. त्यामुळे दुर्घटनांना सतत सामोरे जावे लागते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT