bharati-vidyapeeth 
पुणे

लवळे येथील भारती महाविद्यालयात 'घनकचरा व्यवस्थापन'

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट  - "पर्यावरण संरक्षणाची जाणीव ठेऊन देशाचा शाश्वत व संधारणीय विकास साधला पाहिजे. मनुष्याने औद्योगिक क्रांतीपासून खूप मोठ्या प्रमाणात विकास केला पण त्याचबरोबर पर्यावरणाची अपरिमित व न भरून येणारी हानी केली व या सर्वांसाठी आपण अभियंतेही जबाबदार आहोत. त्यामुळे आता जो विकास साधायचा आहे तो पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल अशा पद्धतींचाच अवलंब करून करावा. "असे आवाहन भारती विद्यापीठ इन्स्टीटयूट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि रिसर्चचे संचालक डॉ. एरिक भरुचा यांनी केले. 

लवळे (ता.मुळशी) येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'पर्यावरण संरक्षणासाठी संधारणीय विकास व घनकचरा व्यवस्थापन' व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भरुचा बोलत होते. 

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी मंगेश दिघे, महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील उपस्थित होते. 

मंगेश दिघे यांनी पुणे शहराला भेडसावणाऱ्या पर्यावरणाच्या विविध समस्यांना महानगरपालिका कोणत्या पध्दतीने तोंड देत असते यांची जाणीव करून या विषयीचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अविनाश इंगोले यांनी केले. प्रा.संकेत पवार व प्रा. प्रमोद साळुंखे यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन श्वेताली भागवत या विद्यार्थिनीने केले.
                       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election: ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी दूध संस्थांची सुनावणी पूर्ण ; सोमवारी निकाल; चार सप्टेंबरला अंतिम मतदार यादी

Satara Ganeshotsav Plastic Waste: ‘पेपर ब्‍लास्‍ट’चा ट्रेंड स्‍वच्‍छतेला मारक; पालिकेकडून कारवाईचा विचार; शहराचे आरोग्‍य जपण्‍याचे हवे भान

Bullock Race New Rules : बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी; 18 अटींची पूर्तता तपासणार समिती; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय!

दादाला तुला भेटायचं आहे... पूजा बिरारीच्या भावावर सोपवलेली लग्नाची जबाबदारी; सोहमला कसं केलेलं पास? अभिनेत्री म्हणाली-

Maharashtra Teacher Recruitment 2026 : 13 हजार 129 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड; पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीला वेग, रिक्त पदांसाठी लवकरच 'कन्व्हर्टेड राउंड'

SCROLL FOR NEXT