pune
pune sakal
पुणे

नियोजनाअभावी वाहतूक कोंडीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : रस्त्याचे काम सुरू असल्याने सिंहगड रस्त्याला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण अद्यापही सुटले नसल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या सुटीमुळे आलेल्या पर्यटकांमुळे नांदेड फाट्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे शहर पोलिस विभाग व ग्रामीणच्या हवेली ठाण्याच्या पोलिसांमध्ये ‘तू-तू मैं-मैं’ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सिंहगड रस्त्याचे किरकटवाडी फाटा व नांदेड फाट्यादरम्यान काम सुरू असल्याने सकाळ-सायंकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १८ नोव्हेंबरला सिंहगड रस्त्यावरील वाहतूक वळविण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार पुण्याकडून खडकवासला, सिंहगड, पानशेतकडे जाणाऱ्या पर्यटक व नागरिकांसाठी नांदेड सिटी गेट-नांदेड गाव-शिवणे-उत्तमनगर खडकवासला असा मार्ग ठरवण्यात आलेला आहे. त्यासाठी नांदेड सिटी गेटसमोर खडकवासल्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे; मात्र त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त न ठेवण्यात आल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी सरळ वाहने घातली. परिणामी नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी शहर वाहतूक विभागाकडे, तर शहर वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हवेली पोलिसांकडे बोट दाखवले आहे.

नांदेड सिटी गेटजवळ शहर वाहतूक विभागाने बंदोबस्त वाढविणे गरजेचे आहे. ग्रामीण हद्दीत योग्य बंदोबस्त आहे व वाहतूक खडकवासला धरणापासून वळविली आहे.

- सदाशिव शेलार,

पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

दोन वाहतूक पोलिस नांदेड सिटी गेटसमोर तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिक त्यांच्याशी वाद घालतात. हवेलीच्या पोलिस निरीक्षकांनी तेथे त्यांच्याकडील पोलिस तैनात करणे आवश्यक आहे. सर्व काम ग्रामीण हद्दीतच सुरू आहे.

- राहुल श्रीरामे, उपायुक्त, पुणे शहर वाहतूक विभाग

पर्यटकांमुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. शनिवार-रविवार अतिरिक्त बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे.

- रूपेश घुले, नागरिक, नांदेड

तुमचे अनुभव सांगा...

सिंहगड रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तुमचे अनुभव आम्हाला व्हॉट्सअॅप क्रमांकावर नावासह पाठवा...

८४८४९७३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT