पुणे

सोमाटणे गावचे जागृत देवस्थान

CD

लेख : १
सोमाटणे गावचे जागृत देवस्थान

सोमाटणे गावात श्री चौराई देवीचे मंदिर सुबक, रेखीव व भव्य असावे, असा सर्वांचा दृढ निश्चय झाला. पंचक्रोशीला आकर्षक करेल, असे मंदिर बांधण्याचे ठरले. पाहता पाहता सर्व गाव एक झाले. सर्वांनी आपल्या परीने हातभार लावत मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी ध्यास घेतला आणि हा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी नवीन सुंदर मंदिराचे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
- सोमनाथ मुऱ्हे, महाराष्ट्र राज्य नर्सरी असोसिएशन अध्यक्ष

सोमाटणे गावची ग्रामदेवता श्री चौराई देवी हे एक जागृत देवस्थान आहे. देवीचा वरदहस्त या गावावर असल्याने हे गाव प्रसिद्धीस आले आहे. अगदी पुणे-मुंबई महामार्गाला लागूनच देवीचे गावात व डोंगरावर देवालय आहे. देवीच्या सध्याच्या मूर्तीची १०० वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री भैरवनाथ, मारुती मंदिर, श्री गणपतीची मूर्ती, श्री दत्ताची मूर्ती व एक शिवलिंग अशा पद्धतीने सर्व देव आसनस्थ आहेत.

ग्रामस्थांचे श्रद्धास्थान
गावातील श्री चौराई देवी हे आमच्या सर्व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. गावातील प्रत्येकाची सुरुवात ही गावातील देवीचे दर्शन घेऊन केली जाते. गावातील जत्रा, लग्नसोहळा कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, सभा, बैठका, चर्चा यांचीही सुरुवात मंदिरातूनच केली जाते. साध्या पद्धतीने असलेले हे मंदिर आता मोठ्या दगडी बांधकामातून अधिक आकर्षक दिसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दगडी बांधकाम दिवस-रात्र सुरू आहे. जुन्या पद्धतीने मंदिर दिसावे, या दृष्टिकोनातून मंदिराला आकार देण्यात येत आहे. २०२५ मध्ये सुरू झालेले काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराचे काम अतिभव्य असल्याने गावातील लोकवर्गणीतून हे काम केले जात आहे. जवळपास दीड कोटी रुपयांचे काम असल्याने अतिशय भव्यदिव्य मंदिराचे स्वरूप असणार आहे. गावातील मुख्य चौकात मंदिर असल्याने, समोरील पटांगण, बाजूला असणारी जिल्हा परिषदेची शाळा, थोड्याच अंतरावर बारा महिने वाहणारी पवनामाई मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकणारी आहे.

नवरात्रीमध्ये वार्षिक उत्सव
नवरात्रीच्या काळात देवीचा जागर अधिकच खुलून असतो. नऊ दिवसांच्या या जागर सोहळ्यात महिलांची गर्दी खूपच असते. या दिवसांत आरती, महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. हा सोहळा महिलांसाठी मोठी पर्वणीच असते. या सोहळ्यानंतर जत्रेच्या कालावधीत दूरवरच्या गावांतील भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस करण्यासाठी, फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तेथे येतात. त्यावेळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या शेवटच्या दिवशी आखाड्याच्या कार्यक्रमाने त्या शानदार सोहळ्याची सांगता केली जाते. पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतात. त्या काळात गावात आनंदाचे वातावरण असते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT