पुणे

सोमाटणे ग्राम ः लेख १६

CD

सोमाटणे ग्राम ः लेख १६
---------------------------
सोमाटणे ः नर्सरी हब

गावातील गावपण कसे जपावे, हे सोमाटणे गावातील तरुणांनी चांगल्या पद्धतीने जोपासले आहे. आपल्या गावाची खरी ओळख ही तिथल्या शेती आणि सामाजिक कामातून होते. हीच भावना लक्षात घेऊन गावच्या वेशीपाशी उभारलेल्या नवीन कमानीजवळ आपल्या येणाऱ्या पिढीला शेतीच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी प्रवेशद्वारावर बैलगाडीची उभारणी करण्यात आली आहे. तालुक्यात नव्हे, तर पुणे जिल्ह्यात अशी बैलगाडीची उभारणी कोठेच दिसणार नाही.
- राकेश मुऱ्हे, माजी उपसरपंच, सोमाटणे

सो माटणे ग्रामपंचायतीने पदरमोड आणि लोकसहभागातून गावात जाण्यासाठी चौपदरी रस्ता केला असून, शेतीच्या आठवणीसाठी प्रवेशद्वारावर बैलगाडीची बांधणी केली आहे. मावळातील हा पहिला गावासाठी चौपदरी रस्ता आहे. सोमाटणे गावात जाण्यासाठी पूर्वी गावकऱ्यांना खड्डे-दगडगोट्यांतून मार्ग काढत जावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सोमाटणे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.

ग्रामस्थांच्या एकजुटीतून विकासाचे स्वप्न
सरपंच नलिनी गायकवाड, उपसरपंच राकेश मुऱ्हे, सदस्य आशा मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, प्राची मुऱ्हे, सुजाता मुऱ्हे, गोकूळ गायकवाड, सुरेखा जगदाळे, अरुणा माळी, उमेश जव्हेरी आदींसह ग्रामस्थांनी मावळातील सर्वांत सुंदर व चौपदरी रस्त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंबर कसली आहे. त्यांच्या या उपक्रमाला गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयातून गावाच्या विकासाची ही वाटचाल पुढे आली.

दीड कोटी खर्चातून एक किलोमीटरचा रस्ता
लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीने पदरमोड करून दीड कोटी रुपये खर्चातून एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. प्रत्येक गावकऱ्याने काम चांगले होण्यासाठी विशेष लक्ष दिले. गावकऱ्यांच्या या प्रयत्नांतून तालुक्यातील सर्वांत मोठा व आकर्षक रस्ता ग्रामपंचायतीने चार महिन्यांत तयार केला. गावात जाण्यासाठी दोन पदरी आणि येण्यासाठी स्वतंत्र दोन पदरी मार्ग करण्यात आला आहे.

फूलझाडे आणि पथदिव्यांनी रस्त्याचे सौंदर्य
रस्त्याच्या दुभाजकात आकर्षक फूलझाडे आणि पथदिवे बसविण्यात आले आहेत. गावाची ओळख दिसण्यासाठी रस्त्याची सुरुवात आकर्षक कमानीने करण्यात आली असून, मावळात लोप पावत चाललेल्या बैलगाडी आणि शेतीच्या आठवणीसाठी कमानीच्या मध्यभागी आकर्षक भव्य बैलगाडी ओढणाऱ्या बैलांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे गावात प्रवेश करताना शेतीप्रधान गावाची जुनी ओळख नागरिकांच्या नजरेसमोर येते.

पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे बांधण्यात आले असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र पाणी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतुकीची सोय लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या कामामुळे गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा झाली आहे. चौपदरी रस्त्यामुळे गावाच्या प्रवेशद्वाराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.

मावळातील पहिलाच चौपदरी रस्ता
ग्रामसहभागातून चौपदरी रस्ता हा मावळातील पहिला रस्ता आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, दुभाजकातील फूलझाडे लावणे आणि पथदिवे बसविल्यामुळे आठवडाभरात हा रस्ता दिव्यांच्या प्रकाशाने उजळला आहे. गावाच्या विकासकामांमध्ये लोकसहभागाचा आदर्श या रस्त्याच्या माध्यमातून पुढे आला आहे.

एकजुटीतून विकासाची वाटचाल
गावातील विकास करताना गावातील एकजूट, प्रेम आणि चांगली भावना यातूनच गावाचा विकास होतो. गेल्या दहा वर्षांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा बदल गावात झाला आहे. याचे सर्व श्रेय गावातील मंडळींना जाते. गावातील सर्व ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य आणि ज्येष्ठ यांच्या सहकार्यातून हे सर्व आम्ही त्यावेळी करू शकलो. भविष्यातही गावाच्या विकासासाठी हीच एकजूट, सहकार्य आणि परस्परांबद्दलची चांगली भावना महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे सोमाटणेची ओळख केवळ विकासकामांमुळे नव्हे, तर गावपण जपणाऱ्या ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेही अधिक ठळक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT