some Home quarantine Citizen are missing form pune corona Virus.jpg 
पुणे

CoronaVirus : पुण्यात काही 'होम क्वारंटाईन' नागरिक बेपत्ता

सकाळवृत्तसेवा

पुणे : परदेशातून आलेले आणि ज्यांना होम क्वारंटाईनचा आदेश मिळालेले आहेत असे काही जण त्यांच्या घरी आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हेल्पलाईन क्रमांकावर अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा  इशारा दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेण्याते येत आहे. परदेशातून आलेले परंतु कोणतीही लक्षणे नसलेल्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात आला आहे.   अशा होम क्वारंटाईन नागरिकांची  यादी मागवून त्यांच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला. त्यासाठी पुणे पोलिसांची १३६ पथके या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. या यादीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली. 

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, या पाहणीत बहूतांश लोक घरी आढळून आले मात्र, होम क्वारंचाईनचा आदेश मिळालेले काही जण दिलेल्या पत्यावर आढळून आले नाहीत. हे बेपत्ता झालेले नागरिक कदाचित गावी अथवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नागरिकांनी तातडीने १८००२३३४१३० या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT