Pune sakal
पुणे

Pune : कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे खिंडार

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड विभाग उपविभाग अध्यक्ष ओबीसी नेते अशोक विठ्ठलराव दळवी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

शीतल बर्गे.

बालेवाडी : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड विभाग उपविभाग अध्यक्ष ओबीसी नेते अशोक विठ्ठलराव दळवी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अशोक विठ्ठलराव दळवी यांनी २०१७ मध्ये मनसेचे उमेदवार म्हणून पुणे महापालिका निवडणूक लढवली होती. सद्या त्यांच्याकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड विभाग उपविभाग अध्यक्ष ओबीसी नेते पदाचा पदभार होता. दळवी यांनी महाळुंगे येथे ( ता.१८ , फेब्रुवारी) रोजी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

अशोक दळवी यांचा जनसंपर्क दांडगा असून,पाषाण परिसरात गेली वीस वर्ष सामाजिक कार्यात असून राजकीय क्षेत्रात काम करत आहेत . नगरिकांच्या प्रश्ना साठी कायम तत्पर आहेत. त्यांचे हे सामजिक योगदान मोठे असल्याने ,याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आगामी काळात नक्कीच होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

या कार्यक्रमावेळी," मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असून मला स्वगृही परतल्याचा आनंद होत आहे व आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व नेत्यांचा विश्वास सार्थ करून दाखवेल ",अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे ,अध्यक्ष पुणे शहरप्रमुख संजय मोरे,पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे,पुणे जिल्हा महिला संघटिका स्वाती ढमाले, पुणे शहर उपप्रमुख मयूर भांडे. विभाग प्रमुख संजय निम्हण तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT