वाघोली : धूमधडाक्यात साजरे होणारे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस यांनाही सामाजिक बांधिलकीची किनार कोरोनामुळे लाभू लागली आहे. गरजूंना अन्नधान्य तर आरोग्य, पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांना नाष्टा-जेवण, सॅनिटायझर, मास्क आदी वाटून ते साजरे होऊ लागले आहेत. तर आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने समाजातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेक परराज्यातील, जिल्ह्यातील कामगार या परिसरातही अडकले आहेत. त्यांना प्रशासन, सामाजिक संस्था जेवण अन्नधान्य पुरवित आहेत. संकटाच्या या काळात या कामातही आपला खारीचा वाटा असावा यासाठी वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस याचे औचित्य साधून मदत, वाटप सुरू आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. सेवा बजविणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कधी नाष्टा, कधी जेवण तर कधी सॅनिटायझर, मास्क आदी वस्तू मिळतात. त्यामुळे त्यांनाही आधार मिळतो.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाघोली ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप सातव यांनी वाढदिवसानिमित्त भारत सर्कसला किराणा, भाजीपाला, प्राण्यांना कुटी, भुस्सा भेट दिला तर पोलिसांना मास्क वाटप केले. अतुल व शीतल चोरडिया या बंधूनी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोलिस, आरोग्य कर्मचारी व रस्त्यावरून पायी जाणाऱ्या परराज्यातील कामगारांना नाष्टा वाटप केला.
राजेंद्र सातव यांनी 300 गरजूंना भाजीपाल्याचे वाटप केले. संजय सातव, राजेंद्र तांबे, राजेंद्र पायगुडे यांच्या प्रयत्नातून जिजामाता महिला सहकारी बँकेच्या वतीने 65 हजार रुपयांची मदत वस्तू स्वरूपात सर्कसला करण्यात आली. वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनने प्राथमिक आरोग्य केंद्राला लागणारी औषधे, पीपीई कीट व अन्य वस्तू भेट दिल्या. स्टफ इंडिया कंपनीने पोलिसांना सॅनिटायझर, फेसशिल्ड, हँडग्लोज भेट दिले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र ऋषी पवार यांनी कोरोना वॉरियर्स यांचे कोरोना संक्रमणापासून संरक्षण व्हावे यासाठी आरोग्य केंद्रावरील डॉक्टर्स, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचाऱ्यांना फेस शील्डचे वाटप केले. यापूर्वीही अनेक सोसायटीनी किराणा माला भेट दिला आहे. कोणी चहा, कोणी काढा, कोणी पाण्याची बाटली, कोणी सरबत असेही मदतीचे हात पुढे येत आहेत.
निसर्गप्रेमी व माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे हे बकोरी डोंगरावर आपल्या कुटुंबीया समवेत वृक्ष लावून ते जगविण्याचे काम करीत आहेत. समाजातून पुढे येत असलेल्या या मदतीमुळेच गरजू कामगार व सेवा बजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.