In some places in Koregaon Khurd, the trees are being damaged due to the removal of pimples.jpg 
पुणे

बेकायदा मुरूम उपसा वनसंपदेच्या मुळावर; कोरेगाव येथील प्रकार, वन विभागाचा कारवाईचा इशारा

रुपेश बुट्टेपाटील

आंबेठाण (पुणे) : कोरेगाव खुर्द (ता.खेड) गावाच्या हद्दीलगत असणाऱ्या वनजमिनीतून मुरूम वाहतुकीसाठी रस्ता तयार केला जात आहे. याशिवाय काही ठिकाणी मुरूम काढून नेल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे वनजमीनीचे नुकसान होऊन वृक्षांची नासधूस होत आहे. जर कोणी असे बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर भारतीय वनअधिनियमाअंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिला आहे.

काही ठिकाणी हद्द आणि खुणा निश्चित नाहीत. परंतु स्थानिक ग्रामपंचायत आणि महसूल विभाग यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले. कोरेगाव खुर्द गावाच्या हद्दीत असणाऱ्या गायरनाच्या आणि लगतच्या वन क्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोरांचे आणि अन्य पशु पक्षांचे वास्तव्य आहे.

याशिवाय येथे विविध प्रकारची झाडे आहेत. परंतु अलीकडच्या काळात या गायरनातून मोठया प्रमाणात मुरूम उपसा केला जात असल्याने झाडांचे नुकसान होत असून नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होत आहे.  मुरूम वाहतूक करताना रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी केला जात आहे. त्यासाठी वनहद्दीचा वापर केला जात असून त्यासाठी झाडांचे नुकसान करून मुरूमचा रस्ता तयार केला जात आहे.

याची पाहणी चाकणचे वनपाल एम.सी.गाडे आणि वनरक्षक सुवर्णा जगताप यांनी केली असून तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. या अहवालावरून अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून भविष्यात अजून प्रकार आढळला तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाकडून दिला जात आहे.


संपादन- सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT